मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या काहीशा कठीण काळातून जात असल्याचं वक्तव्य करत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सध्या संघाचा प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविडला काही सल्ले देखील दिले आहेत. नुकताच भारताच्या एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे गेलं आहे. त्यानंतर आता विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं. हे पद आता कोणाकडे जाईल हा प्रश्न असतानाच या सर्व बदलांमुळे संघ तयार करताना काही अडचणी नक्कीच येतील, त्यामुळे योग्यरित्या निवड करावी लागेल. असा सल्ला शास्त्री यांनी द्रविडला दिला आहे.


भारत सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. ज्यामध्ये आधी भारताने कसोटी मालिका 2-0 ने गमावली. तर नंतर एकदिवसीय मालिका 3-0 च्या लाजिरवाण्या फरकाने गमावली. ज्यानंतर आता आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताने संघात बरेच बदल केले आहेत. एकदिवसीय संघातील 5 खेळाडूंना रिप्लेस करण्यात आले आहे. दरम्यान हे सर्व घडत असल्याने शास्त्री यांनी द्रविडला सल्ला देताना, 'कोणत्याही एका खेळाडूला तयार करण्यात अधिक वेळ न घालवता पुढील 5-6 वर्षे संघासाठी चांगलं क्रिकेट खेळतील, अशा खेळाडूंना संधी द्या' असा सल्ला दिला आहे.


दरम्यान भारत 6 फ्रेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज विरुद्ध मर्यादीत षटकांचे सामने खेळणार असून यासाठी बीसीसीआयने नुकताच संघ देखील जाहीर केला आहे.


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान 


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.  


वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक 


एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद


टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha