Bangladesh Violence: भारताच्या (India) शेजारील देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचार (Bangladesh Violence) सुरु आहे. या राजकीय संघर्षामुळं पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. बांगलदेशमधील हिंदूवर अत्याचार होत असून मंदिरे देखील पाडली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.


भारत-बांगलादेश सीमेवरील (आयबीबी) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती बांगलादेशातील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी साधणार आहे. यामधून भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित होईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित अमित शाह यांनी द्विट करून दिली. याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघातील माजी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. 


दानिश कनेरिया काय म्हणाला?


हिंदूंवर होत असलेले अत्याचार पाहून माझे रक्त उकळत आहे. संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांचे मौन शरमेची बाब आहे. यासोबत त्याने हॅशटॅगमध्ये सेव्ह बांगलादेशी हिंदू असे लिहिले आहे.



ढाका येथे हिंदूंचे निदर्शने


बांगलादेशात आंदोलनाच्या नावाखाली प्रचंड गदारोळ सुरू आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात आहेत. हिंदूंवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराबाबत ढाका येथे निदर्शने करण्यात आली. ढाक्यातील शाहबाग चौकात हजारो हिंदू जमले होते. येथे हिंदू लोकांनी एकत्र येत आपल्या सुरक्षेसाठी चार मागण्या केल्या. तिथे त्यांनी आम्ही बांगलादेश सोडणार नसल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले.


अमित शाह काय म्हणाले?


केंद्र सरकार सर्व प्रयत्न करून बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करणार आहे. या समितीकडे प्रामुख्याने भारत-बांगलादेशातील सीमेवरीलसंरक्षणाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अशा प्रकारची भूमिका नुकत्याच झालेल्या बांगलादेशातील हिंसाचाराच्या प्रकारानंतर घेण्यात आली आहे. आहेत. त्यानंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. हिंदूंचे घरे, दुकाने व मंदिरावर हल्ले केले जात आहेत. त्यासोबतच अवामी लीगशी संबंधित हिंदू नेत्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


बांगलादेशातील 500 कैदी तुरुंगातून पळाले-


बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली. मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे. हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही. तुरुंगात घुसूनही जमावानं जाळपोळ केली. या काळात सुमारे 500 कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.