Vinod Kambli, Mumbai : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याची तब्येत बरी नसल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. विनोद कांबळीला जास्त वेळ उभं राहताना अडचण येत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विनोद कांबळीला 
 इतर लोकांची मदत घ्यावी लागत असल्याचं पाहायला मिळालं होतं. 






मॉर्कस मी ठीक आहे, देवाच्या कृपेने मी ठीक आहे


नव्या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी त्याच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहे. यामध्ये विनोद कांबळी म्हणाला की, मी बरा आहे. मॉर्कस मी ठीक आहे. देवाच्या कृपेने मी ठीक आहे. पुढे त्याच्या मित्राने फलंदाजी करण्यासाठी तयार आहे का? असे विचारल्यानंतर मी तयार असल्याचे विनोद कांबळी म्हणालाय. यावेळी बोलताना त्याने फिरकीपटूंना इशारा दिला आहे. त्यांनी मैदानाच्या बाहेर उभं राहावं, असंही तो विनोदाने म्हणत आहे. या सर्वात तो शिवाजी पार्कचा उल्लेख करण्यास विसरलेला नाही. 


विनोद कांबळीचं वय 52 वर्ष असून त्याची ही स्थिती पाहून क्रिकेट चाहत्यांना देखील वेदना झाल्या होत्या. अखेर काही क्रिकेट चाहत्यांनी सचिन तेंडुलकरकडे मदतीची मागणी केली होती. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी लहानपणी मित्र होते. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोघांना रमाकांत आचरेकर यांनी मार्गदर्शन केलं होतं.  विनोद कांबळी ह्रदयविकारासह डिप्रेशनचा देखील सामना करत आहे.  त्यामुळं अनेकदा रुग्णालयात जावं लागतं. विनोद कांबळी यांना  2013 मध्ये ह्रदय विकाराचा धक्का बसला होता. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यानं रुग्णालयात नेऊन विनोद कांबळी यांचा जीव वाचवला होता. सचिन तेंडुलकरनं 1989 नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर विनोद कांबळीनं 1991 मध्ये पदार्पण केलं. विनोद कांबळीनं पाकिस्तान विरुद्ध पहिली मॅच खेळली होती.


इतर महत्वाच्या बातम्या 


Arshad Nadeem : वडिलांनी मजुरी केली, गावकऱ्यांनी वर्गणी काढून पैसे जमवले, अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकत संधीचं सोनं केलं