(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amitabh Choudhary Passes Away: जेएससीएचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Amitabh Choudhary Passes Away: अमिताभ चौधरी यांच्यावर रांची येथील संतेविता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी वयाच्या 62 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
Amitabh Choudhary Passes Away: झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे (Jharkhand State Cricket Association) माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी (Amitabh Choudhary) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. त्यांच्यावर रांची येथील संतेविता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी वयाच्या 62 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमिताभ चौधरी यांच्या निधनानं क्रिडाविश्वात शोककळा पसरलीय. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
अमिताभ चौधरी यांचा जन्म 6 जुलै 1960 साली झाला आणि आज 16 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बीसीसीआयमध्ये अमिताभ चौधरीनं महत्वाची भूमिका बजावलीय.त्यांनी कार्यकारी सचिव पदाचा भार संभाळला आहे. त्यांना 2020 मध्ये झारखंड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. नुकतीच त्यांनी निवृत्ती झाली. झारखंडच्या उत्कृष्ट आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक अमिताभ यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त जेएससीए स्टेडियमवर तिरंगा फडकवला होता. झारखंड क्रिकेटमध्ये त्यांचं मोठं योगदान असल्याचं म्हटलं जातं.
अमिताभ चौधरी यांचा थोडक्यात प्रवास
अमिताभ चौधरी यांनी 1984 मध्ये आयआयटी खरगपूर येथून बी.टेक पदवी पूर्ण केली. यानंतर ते 1985 मध्ये आयपीएस झाले. यूपीएससी परीक्षेत त्यांनी इतिहास आणि भूगोल या पर्यायी पेपरमध्ये ठेवले. पहिल्याच प्रयत्नात त्यानं ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयपीएस श्रेणीत संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला. चौधरी 1997 मध्ये रांचीचे एसएसपी बनले होते. वेगळ्या राज्याच्या निर्मितीनंतर, आपल्या क्षमता, समजूतदारपणा आणि चांगल्या टीममुळं त्यांनी रांचीच्या लोकांमधील गुन्हेगारांची भीती संपवली, जी आजही लोकांच्या स्मरणात आहे.
2014 मध्ये राजकारणात एन्ट्री
अमिताभ चौधरी यांनी नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर 2013 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. बाबूलाल मरांडी यांच्या माजी पक्ष जेव्हीएमकडून त्यांना तिकीट मिळालं. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ते 67 हजार मतांनी चौथ्या क्रमांकावर आले.
झारखंडच्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन शोकाकूळ
अमिताभ चौधरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटरवर लिहिलंय की, “जेपीएससीचे माजी अध्यक्ष श्री अमिताभ चौधरी यांच्या आकस्मिक निधनाची दुःखद बातमी. माजी आयपीएस अधिकारी अमिताभजी यांनीही राज्यातील क्रिकेटचा खेळ वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ईश्वर दिवंगत अमिताभ यांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल परिवाराला हे या दुःखातून बाहेर येण्याची शक्ती देवो.
अमिताभ चौधरी 2002 बीसीसीआयचे सदस्य झाले. यानंतर 2005 मध्ये त्यांनी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुदेश कुमार महतो यांचा पराभव करून झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.त्यानंतर 2005- 2009 या काळात ते क्रिकेट टीम इंडियाचे व्यवस्थापकही होते.
हे देखील वाचा-