एक्स्प्लोर

Kapil Dev on Majha Katta : वाचा काय होती कपिल देव यांची प्रेमकहाणी...

Majha Katta :1983 च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली.

Kapil Dev on Majha Katta : सध्या बॉक्स ऑफिसवर एकच चर्चा आहे ती म्हणजे,  '83' ची. या ऐतिहासिक विजयाची गोष्टी आपण याआधीही अनेकदा ऐकल्यात आणि पाहिल्यातही. पण मोठ्या पडद्यावर या विजयाचा थरार पाहण्याचा रोमांच काही औरच. क्रिकेटवेड्या आपल्या देशासाठी 1983 चा तो क्षण सुवर्णक्षणच. हाच क्षण इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिणारे आणि हा इतिहास घडवणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एबीपीच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाचा तो थरार, त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. यावेळी देशाचा ऐतिहासिक विजयाचा मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवासही उलगडून सांगितला. एवढंच नाहीतर कपिल देव यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

मोठ्या पडद्यावर गोष्ट उलगडताना पाहुन खरंच खूप आनंद होत असल्याचं देव यांनी सांगितलं. तसेच मोठ्या पडद्यावर तुमची प्रेमकहानी कुठेतरी मिसिंग वाटतेय, असं विचारताच. क्षणाचाही विलंब न लावता, देव म्हणाले, "तुम्ही थोडा वेगळा विचार करताय. संपूर्ण चित्रपटात माझी लव्ह स्टोरी सर्वात जास्त आहे. माझी लव्हस्टोरी क्रिकेट आहे. तुम्ही थोडा वेगळा विचार करताय." याव्यतिरिक्त कपिल देव यांनी बोलताना विश्वचषक आणि त्यावेळच्या अनेक आठवणी सांगितल्या. ते क्रिकेट फक्त खेळले नाहीतर तर क्रिकेट जगले, असंही देव यांनी बोलताना सांगितले.

1983 चा विश्वचषक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. या विजयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहराच जणू बदलला. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून इतिहास रचला. या विजयाच्या आठवणी आजही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. दरम्यान या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 1983 विश्वचषकाच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने एक वेगळी चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजला मात देत आत्मविश्वास कमालीचा वाढलेल्या भारतीय संघाने नंतर सलग दोन सामने गमावूनही पुनरागमन करत विश्वचषक जिंकला. यावेळी कर्णधार कपिल यांनी उल्लेखणीय कामगिरी केली.

दरम्यान, 1983 च्या विश्वचषक विजयावरील सिनेमा '83'  नुकताच प्रदर्शित झाला. ज्यानंतर 1983 च्या त्या ऐतिहासिक विजयाचा आनंद आणि आठवणी भारतभर पसरु लागल्या. याच निमित्ताने या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यांनी काही आठवणीतले किस्से शेअर केले. हे सारे किस्से कपिल देव यांच्यासोबतच्या माझा कट्टामध्ये तुम्ही पाहू शकता. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget