BCCI Central Contract 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्था बीसीसीआयने यंदाच्या वर्षीचे करार जाहीर केले असून 28 खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. बीसीसीआयने बुधवारी ही लिस्ट जाहीर केली असून यामध्ये टॉप ग्रेड A+ मध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना मात्र मोठं नुकसान झालं आहे.
मागील काही काळापासून रहाणे आणि पुजारा यांचा परफॉरमन्स खास नसल्याने त्यांना A ग्रेडमधून B मध्ये टाकलं आहे. तर रिद्धिमन साहा याला B ग्रेडमधून C ग्रेडमध्ये टाकलं आहे. यात सर्वात मोठा तोटा हार्दीक पंड्या याचा झाला आहे. एकेकाळचा भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दीक त्याच्या खराब कामगिरीमुळे सध्या संघात नाही. त्यामुळे त्याला A ग्रेडमधून थेट C मध्ये टाकलं आहे.
काय आहे कॉन्ट्रॅक्ट?
ऑल इंडिया सीनियर सिलेक्शन कमिटीने ही यादी तयार केली आहे. या सर्व खेळाडूंचा हा करार एक वर्षासाठी आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये खेळाडूंना वर्षभरासाठी देण्यात येणारी रक्कम आणि सोयीसुविधा यांमध्ये या फरक पडतो. जितका अधिक क्लासमध्ये खेळाडू तितका त्याला पगार अधिक असं साधारण गणित आहे.
चार वर्षानंतर भारत आयर्लंड दौऱ्यावर
IPL 2022 नंतर भारतीय क्रिकेट संघ जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 26 जून आणि दुसरा सामना 28 जून रोजी खेळवला जाईल. दोन्ही सामने मलाहाईडमध्ये खेळवण्यात येतील. क्रिकेट आयर्लंडने सोशल मीडियावर भारत-आयर्लंड टी-20 मालिकेचं वेळापत्रक जारी केलं आहे. भारतासोबतच न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा संघ देखील आयर्लंडचा दौरा करणार आहे. आयर्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात मर्यादित षटकांची मालिकाही खेळणार आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?
- Team India चा जूनमध्ये आयर्लंड दौरा, वेळापत्रक जारी
- MS Dhoni: 'स्वप्न सत्यात उतरलं' महेंद्रसिंह धोनीला भेटल्यानंतर पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha