Sarah Taylor Social Media Post: इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर सारा टेलरने (Sarah Taylor) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तिने तिची पार्टनर डायनासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिनं डायनाची प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. यासोबतच तिनं सोनोग्राफीचा फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये डायनाच्या गर्भात वाढत असलेल्या अर्भक दिसतंय. सारा टेलरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सारा टेलरनं फोटो शेअर करताना लिहिलंय की, "आई होणं हे माझ्या पार्टनरचं स्वप्न होतं. हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता, पण डायनानं अजिबात हार मानली नाही. ती खंबीर होती. मला माहीत आहे की, ती उत्तम आई बनेल. मी या प्रवासाचा एक भाग असल्यामुळे खरंच खूप आनंदी आहे. आता केवळ 19 आठवडे शिल्लक आहे. त्यानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल."
साराने या पोस्टसोबत LGBT चा इंद्रधनुष्य इमोजी देखील टाकला आहे. साराच्या या पोस्टवर क्रिकेट चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेतच पण त्यांचा प्रवास, संघर्ष आणि जगण्याच्या पद्धतीचेही कौतुक करत आहेत. साराच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू अॅडम गिलख्रिस्टनंही (Adam Gilchrist) प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंडची दिग्गज माजी महिला क्रिकेटर सारा टेलर
इंग्लंड महिला क्रिकेट संघाची माजी यष्टिरक्षक आणि फलंदाज असलेल्या सारा टेलरने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. ती महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आणि सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे टेलरने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. पण त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी ती परतली. 2017 मध्ये महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सारा टेलरनं दणक्यात पुनरागमन केलं होतं. सारानं 49.50च्या सरासरीनं 396 धावा केल्या. सारानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 147 आणि सेमीफायनल्समध्ये 54 आणि फानल्समध्ये टीम इंडियाविरुद्ध 45 धावा केल्या होत्या.
न्यूड फोटोमुळे आली होती चर्चेत
इंग्लंड महिला क्रिकेट संघाची विकेटकीपर-फलंदाज सारा टेलरनं एक न्यूड फोटो शेअर केला होता. न्यूड फोटोमुळे सारा टेलर खूपच चर्चेत आली होती. साराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक न्यूड फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ती हातात एक बॅट पकडून उभी होती. फोटो शेअर करताना सारानं ''Waiting to go into bat like..'' असं कॅप्शन दिलं होतं. याशिवाय सारा आपल्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :