Fans Reaction After Selectors Ignore Rinku Singh : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघाची निवड बुधवारी केली. अजित आगरकर याच्या नेतृत्वातील निवड समितीने 15 सदस्यीय टीम इंडियाची निवड केली आहे. हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारतीय संघात यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा यासारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण निवड समितीने युवा रिंकू सिंह याच्याकडे दुर्लक्ष केले. रिंकू सिंह याला संघात स्थान न मिळाल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झालाय. नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. चांगल्या कामगिरीनंतरही रिंकूला संघात का स्थान मिळाले नाही ? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. रिंकू सिंह याने आयपीएल अखेरच्या पाच चेंडूवर पाच षटकार मारत कोलकात्याला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर रिंकूची देशभरात चर्चा झाली होती. 


वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघानंतर टी20 संघात काही नव्या दमाच्या खेळाडूंना स्थान मिळणार, हे जवळपास निश्चित झाले होते. यामध्ये रिंकू सिंह याची नावाची जोरदार चर्चा होती. माजी क्रिकेटपटूनेही रिंकूला लवकरच भारतीय संघात स्थान मिळेल, असे वक्तव्य केले होते. पण, बुधवारी अजित आगरकर याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला जाणाऱ्या टी 20 संघाची घोषणा झाली. त्यामध्ये रिंकू सिंह याला संधी मिळाली नाही. रिंकूला टीम इंडियात संधी न मिळाल्यामुळे नेटकरी भडकले आहेत.  


आयपीएलमध्ये रिंकूची कामगिरी - 


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात रिंकू सिंह याने प्रभावी कामगिरी केली होती. रिंकूने कोलकात्यासाठी 59.25 च्या सरासरीने 14 सामन्यात 474 धावा चोपल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 150 इतका राहिलाय. रिंकू सिंह याने कोलकात्यासाठी फिनिशरची भूमिका यशस्वीपणे पार पाडली होती. रिंकूने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला होता. निवड समितीने तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांना संधी दिली. पण रिंकूकडे दुर्लक्ष केले. 


देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिंकूचा दबदबा


फक्त आयपीएलमध्येच नाही तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही रिंकूने वादळी फलंदाजी केली आहे. रिंकून आपल्या कामगिरीने नेहमीच प्रभावीत केलेय. रिंकूने आतापर्यंत 41 सामन्यात 59 च्या सरासरीने 2919 धावा केल्या आहेत. यामध्ये सात शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे.  


 






































युवा खेळाडूंना संधी - 


आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या काही युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. यामध्ये यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. तिलक वर्मा याने आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघासाठी प्रभावी कामगिरी केली होती, तर मुंबईसाठी तिलक वर्मा संकटमोचक झाला होता. या दोन खेळाडूंना संधी देत निवड समितीने मोठे पाऊल उचलले आहे. 


यांना डावलले - 









आणखी वाचा :


रोहित-विराटला विश्रांती, तिलक, यशस्वीला संधी; रिंकूला डावलले 


हार्दिक पांड्या कर्णधार, तिलक वर्मा, यशस्वी जायस्वाल यांना संधी, वेस्ट इंडिजविरोधात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड