England Reece Topley Injury : गतवेळचा विश्वचषक विजेता इंग्लंड संघाला यंदाच्या विश्वचषकात अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आधीच एकापाठोपाठ एक पराभवाचा सामना करणाऱ्या इंग्लंडला आणकी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टॉप्ले याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे रीस टॉप्ले याने विश्वचषकातून माघार घेतली आहे. मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरोधात रीस टॉप्ले याच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे उर्वरीत स्पर्धेतून रीस टॉप्ले बाहेर गेला आहे. इंग्लंडचे स्टार खेळाडू आधीच फॉर्माशी झगडत आहेत, त्यात आता प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. हा इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जातोय. 






दुखापतीनंतर रीस टॉप्लेला राग अनावर, केली तोडफोड...


मुंबईमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात गतवेळच्या विजेत्या इंग्लंडला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. याच सामन्यात रीस टोप्ले याच्या बोटाला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे रीस टोप्ले याला मैदान सोडावे लागले होते. मैदान सोडावे लागल्यानंतर रीस टोप्ले याला राग अनावर झाला होता. त्याने ड्रेसिंग रुममध्ये जाताना खुर्ची फेकून दिली होती. त्याशिवाय ड्रेसिंग रुममध्ये तोडफोडही केली. रीस टॉप्ले याचा हा अंदाजही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. रीस टोप्ले स्पर्धेबाहेर गेल्यानंतर इंग्लंडला मोठा झटका बसलाय. 










इंग्लंडची यंदाच्या विश्वचषकात खराब कामगिरी -


गतवेळच्या विश्वचषक विजेत्या इंग्लंडला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे इंग्लंडला तीन पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तान संघाकडूनही इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागलाय. इंग्लंड संघाचे स्पर्धेतील आव्हान अतिशय खडतर झाले आहे. चार सामन्यात इंग्लंडला फक्त एक विजय मिळवता आला आहे. गतविजेते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडच्या खाली फक्त अफगाणिस्तानचा संघ आहे. श्रीलंका, नेदरलँड आणि बांगलादेशही इंग्लंडपेक्षा वरती आहेत. भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या तीन स्थानावर आहेत.