धरमशाला : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील 21 वा सामना धर्मशालाच्या मैदानावर खेळला जात आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियामध्ये बॅटिंग लाईन आणि टीम संतुलन राखण्यासाठी गेल्या चार सामन्यांमध्ये बाकावर बसवलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आज अक्षरशः आपला मागील चार सामन्यांचा राग एकत्रित काढताना न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने घेतलेल्या पाच विकेटमुळे एकवेळ सामना भारताच्या हातून गेला असं वाटत असतानाच त्याने केलेल्या भेदक गोलंदाजीने भारताने पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन केले. 






त्यामुळे न्यूझीलंडचा डाव 273 धावांमध्ये गुंडाळला गेला. शमीने पाच विकेट घेतानाच न्यूझीलंड मोठ्या धावसंख्येपासून वाचवलं असं म्हणावं लागेल. नवव्या षटकांमध्ये त्याला गोलंदाजी दिल्यानंतर पहिल्याच चेंडूवर विल यंगला क्लिन बोल्ड करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर त्याचे दुसरे षटकही मोहम्मद शमीचे रोमांचक असेच झाले. याच षटकात रचिन रवींद्रला विकेटला झेलबाद देण्यात आले. मात्र, त्याने रिव्ह्यू घेतला असता तो वाचला. त्यानंतर त्याच षटकामध्ये एक सोपा झेल जडेजाने रचन रवींद्रचा सोडल्याने भारताला मोठा फटका बसला. अन्यथा सामन्याचे चित्र आणखी वेगळे दिसले असते. त्यानंतर या दोघांनी केलेली 160 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. 






त्यानंतर पुन्हा एकदा शमीच मदतीसाठी धावून आला. त्याने न्यूझीलंडची मधली फळी कापून काढली. त्यामुळे भारताला या सामन्यामध्ये पुनरागमन करता आले. जी अवस्था 20 व्या षटकापासून ते 36व्या षटकांपर्यंत झाली होती ती भारताने शेवटच्या 10 षटकांमध्ये भरून काढली. या 10 षटकांमध्ये टिचून मारा शमीने आणि बुमराहने केला. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखता आले.  तत्पूर्वी, या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या बाहेर असल्यामुळे या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये दोन मोठे बदल करण्यात आले. त्यात मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश करण्यात आला. 






शमीचा मोठा पराक्रम 


भारतीय संघाने 9व्या षटकात मोहम्मद शमीकडे गोलंदाजीची धुरा सोपवली आणि त्याने पहिला चेंडू योग्य रेषेवर टाकला आणि यंगला गोलंदाजी करून भारताला सामन्यातील दुसरे यश मिळवून दिले. यासह मोहम्मद शमी आता विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. शमीने भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेला मागे टाकले. ज्याने वर्ल्डकपमध्ये भारतासाठी 31 विकेट घेतल्या होत्या. आता शमीच्या नावावर 36विकेट्स झाल्या आहेत. टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जवागल श्रीनाथच्या नावावर आहे ज्याने 44 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खान दुसऱ्या स्थानावर असून त्याने वर्ल्ड कपमध्ये 44 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.






विश्वचषक 2023 मध्ये भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह या यादीत पाचव्या स्थानावर असून त्याच्या नावावर आतापर्यंत 28 विकेट आहेत. या विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून दोन्ही संघांनी 4-4 सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. भारतापेक्षा चांगल्या धावगतीमुळे न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.


इतर महत्वाच्या बातम्या