England T20I And ODI Squad For Australia Series: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात 11 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान 3 सामन्यांची टी-20 मालिका आणि 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे.
इंग्लंडने जाहीर केलेल्या संघावरुन आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण दिग्गज फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि मोईन अलीसह अनेक दिग्गज खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहेत. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडमधून 5 अनकॅप्ड खेळाडूंची निवड करण्यात आली. सध्या इंग्लंड श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने बाजी मारली आहे. ही कसोटी मालिका 10 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर इंग्लंडची ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबरपासून सुरू होईल.
पाच अनकॅप्ड खेळाडूंना स्थान-
इंग्लंडने काही दिग्गज खेळाडूंना वगळून पाच अनकॅप्ड खेळाडूंचा संघात समावेश केला. या पाच खेळाडूंमध्ये फलंदाजी अष्टपैलू जेकब बेथेल, डॅन मौसली, फलंदाज जॉर्डन कॉक्स, गोलंदाज जॉन टर्नर आणि जोश हल यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जोश हल, जेकब बेथेल आणि जॉन टर्नर हे एकदिवसीय संघाचा देखील भाग आहेत.
बेअरस्टो आणि मोईन अलीला वगळले-
जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली या खेळाडूंचे वाढते वय आता संघात स्थान मिळवण्यासाठी समस्येचं कारण बनत आहे. वाढत्या वयामुळे हे खेळाडू संघातील स्थान गमावताना दिसत आहेत. जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनलाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, या खेळाडूंना संघात स्थान का मिळाले नाही, हे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आले नाही.
इंग्लंडचा टी-20 संघ-
जॉस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम कुरन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मुसली, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली, जॉन टर्नर.
इंग्लंड एकदिवसीय संघ-
जॉस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जोश हल, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, रीस टोपली, जॉन टर्नर.
संबंधित बातमी:
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाले, पण 1 डिसेंबरला जबाबदारी स्वीकारणार; यामागचं कारण काय?, जाणून घ्या!