Jay Shah ICC Chairman : सर्वोच्च क्रिकेट मंडळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीची कमान एका भारतीयाच्या हाती गेली आहे. खरंतर, जय शाह यांची आयसीसीच्या पुढील अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआय सचिव आणि जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्षपद भूषवत होते. परंतु आता ते 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसीसचे प्रतिष्ठित पद सांभाळतील. आयसीसीचे सर्वात मोठे पद भूषवणारे ते सर्वात तरुण व्यक्ती असणार आहे. वयाच्या 35 व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केली.


जय शाह यांनी केलं मोठं विधान


विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसरी टर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने शाह यांच्या अध्यक्षपदी निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला. आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर शाह यांनी क्रिकेटचा जागतिक स्तरावर पोहोच आणि लोकप्रियता वाढवण्याचा मानस व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचे शाह म्हणाले. क्रिकेटला अधिक जागतिक बनवण्यासाठी ते आयसीसी आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे.


ते म्हणाले की, आयसीसी सध्या अश्या टप्प्यावर उभी आहे, जिथे तिन्ही फॉरमॅटमधील समतोल राखणे आणि नवीन जागतिक बाजारपेठांमध्ये मोठ्या घटनांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. यासोबत क्रिकेटला पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रिय बनवण्याचा आपला उद्देश आहे.


बीसीसीआयचे पद सोडावे लागणार


शाह यांना आता बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागणार आहे. जे ते गेल्या 5 वर्षांपासून सांभाळत आहेत. शाह सध्या आयसीसीच्या वित्त आणि व्यवसाय व्यवहार उपसमितीचे प्रमुख आहेत. 2022 मध्ये ते या उपसमितीचे अध्यक्ष झाले. 


आयसीसी चेअरमन म्हणून निवडून आलेले जय शाह हे पाचवे भारतीय आहेत. यापूर्वी जगमोहन दालमिया (1997-2000), शरद पवार (2010-2012), एन श्रीनिवासन (2014-2015) आणि शशांक मनोहर (2015-2020) यांनी हे पद भूषवले होते. यापूर्वी आयसीसीचे मध्ये अध्यक्ष पद होते जे 2016 मध्ये रद्द करण्यात आले आणि त्याच्या जागी आयसीसीचेअरमन पद आणण्यात आले.


हे ही वाचा : 


Jay Shah ICC New Chairman : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा, जय शाह यांची ICC चे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड


Rishabh Pant : जिंकलंस भावा! ऋषभ पंतने कॉलेजच्या गरीब विद्यार्थ्यांची केली मदत; फी भरण्यासाठी दिले इतके पैसे