विराटला प्रपोज करणाऱ्या डॅनिअल वॅटनं गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा
Danni Wyatt gets engaged : इंग्लंड महिला संघाची अष्टपैलू डॅनिअल वॅट हिने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा उरकला आहे.
England cricketer Danni Wyatt gets engaged : इंग्लंड महिला संघाची अष्टपैलू डॅनिअल वॅट हिने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा उरकला आहे. वॅटने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून डॅनिअल वॅट आणि जॉर्जी हॉज डेट करत होत्या. आज त्यांनी साखरपुडा केला आहे. वेटने सोशल मीडियावर जॉर्जी हॉज हिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत साखरपुड्याची माहिती दिली. या बामतीमुळे तिचे चाहते भलतेच आनंदात आहेत. विशेष म्हणजे, तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षावही करत आहेत. काही नेटकऱ्यांनी वॅटची फिरकी घेतली आहे. डॅनिअल वॅट हिने काही वर्षांपूर्वी विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केले होते. तेव्हापासून डॅनिअल वॅट चर्चेत आली होती. डॅनिअल वॅटचे भारतामध्येही खूप चाहते आहेत.
डेनियल वॅट आणि जॉर्जी हॉज अनेक दिवसांपासून एकमेंकींना डेट करत होत्या. डॅनिअल वॅट इंग्लंड महिला संघातील महत्वाची सदस्य आहे. तर जॉर्जी सीएए बेस फुटबॉल महिला संघाची प्रमुख आहे. महिला टी 20 विश्वचषकाचा थरार संपल्यानंतर डॅनिअल वॅट हिने आपला साखरपुडा उरकला आहे. हा विश्वचषक डॅनिअलसारखी सरासरी राहिला आहे. तिला खास कामगिरी करता आलेली नाही. डॅनियल वॅट आणि जॉर्जीने अधीच आपल्या नात्याला सार्वजनिक केले होते. सोशल मीडियावर दोघींचे अनेक फोटो आहेत. आज डॅनिअल वॅट हिने सोशल मीडियावर पोस्ट करत साखरपुड्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये डॅनियलने पार्टनर जॉर्जी हॉज हिच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत डॅनीच्या पार्टनरच्या हातात अंगठीदेखील दिसत आहे. “तू सदैव माझी” असे डॅनिअलने पोस्टमध्ये लिहिलेय.
View this post on Instagram
डॅनिअल वॅट हिने इंग्लंड महिला संघासाठी 102 वनडे आणि 143 कसोटी सामने खेळले आहेत. वॅटने वनडेत 1776 धावा चोपल्या आहेत. तर टीमध्ये 2369 धावांचा पाऊस पाडला आहे. तर गोलंदाजीत वॅटने हिने वनडेत 27 तर टी20 मध्ये 46 विकेट घेतल्या आहेत. डॅनियल वॅटने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदारप्ण केले होते. त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यात ती इंग्लंड संघाची महत्वाची सदस्य झाली. आपल्या अष्टपैलू खेळीच्या बळावर वॅटने अनेक सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला.
IPL 2023 : बुमराह नाय म्हणून काय झालं आपल्याकडे जोफ्रा हाय ना... मुंबईच्या चाहत्यांना मिळाली खूशखबर!