England vs Sri Lanka 3rd Test : श्रीलंकेने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा 8 गडी राखून पराभव केला आहे. खरंतर या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी दोन्ही क्षेत्रात अप्रतिम कामगिरी केली. इंग्लंडने श्रीलंकेला 219 धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा श्रीलंकेने सहज पाठलाग केला. पथुम निसांकाने दुसऱ्या डावात लंकेसाठी शानदार फलंदाजी केली. त्याने 127 धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच्यामुळेच संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.


श्रीलंकेने 10 वर्षांनंतर जिंकली इंग्लंडविरुद्धची कसोटी 


श्रीलंकेने 2014 साली इंग्लंडविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. आता 10 वर्षांनंतर श्रीलंकेने इंग्लंडचा कसोटी सामन्यात पराभव केला आहे. 2014 नंतर श्रीलंकेने  इंग्लंडविरुद्ध 10 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 9 इंग्लंडने जिंकले आणि एक कसोटी अनिर्णित राहिली. पण आता अखेर श्रीलंकेच्या संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत विजय मिळाला आहे. इंग्लिश भूमीवर श्रीलंकेचा इंग्लंडविरुद्धचा हा चौथा विजय आहे. यापूर्वीचा विजय 2014 साली झाला होता.






इंग्लंड संघाचे क्लीन स्वीपचे स्वप्न भंगले


2004 पासून इंग्लंडने आपल्या भूमीवर उन्हाळ्यात कोणत्याही संघाचा क्लीन स्वीप केला नाही. श्रीलंकेविरुद्ध संघाला ही कामगिरी करता आली असती. कारण त्याने पहिली कसोटी 5 विकेट्सने आणि दुसरी कसोटी 190 धावांनी जिंकली होती. पण उन्हाळ्यात त्यांच्याच भूमीवर क्लीन स्वीप करण्याचे त्यांचे स्वप्न श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पराभवामुळे भंगले.


पथुम निसांकाने ठोकले शतक 


पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती आणि 325 धावा केल्या. यानंतर लंकेचा संघ पहिल्या डावात 263 धावाच करू शकला. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडला 62 धावांची आघाडी मिळाली. अशा स्थितीत इंग्लंडचा संघ सहज सामना जिंकेल, असे सर्वांना वाटत होते. 


पण दुसऱ्या डावात इंग्लंडची फलंदाजी खराब झाली आणि त्यांना केवळ 156 धावा करता आल्या. अशाप्रकारे लंकेला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य मिळाले. पथुम निसांका लंकेसाठी सर्वात मोठा हिरो ठरला आहे. निसांकाने 127 धावांची खेळी खेळून विजय मिळवला.






हे ही वाचा -


IND vs BAN : चेन्नई कसोटीत 'ही' असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11, कर्णधार रोहित कोणाला बसवणार कट्ट्यावर?


Ind vs Ban : भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीसाठी जाहीर झालेल्या टीम इंडियामध्ये 'हे' 7 मोठे बदल


Yash Dayal : डर के आगे जीत है! IPLमध्ये सलग 5 सिक्सर खाल्ल्यामुळे करिअर संपल्याची टीका, त्याच बॉलवर गंभीर-रोहित शर्माने खेळला डाव