Team India Playing-11 For Chennai Test Against Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. एकीकडे श्रेयस अय्यर संघाबाहेर केले आहे, तर यश दयालला देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले आणि त्याला संधी मिळाला आहे.
टॉप ऑर्डर
बांगलादेशसोबत खेळल्या जाणाऱ्या चेन्नई कसोटी सामन्यात रोहित शर्मा भारताकडून सलामीला येईल हे निश्चित आहे. त्याच्यासोबतच यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरू शकतो. म्हणजेच रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी ओपनिंग करताना दिसू शकते.
शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. गिलने आतापर्यंत 17 डावांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, 41.20 च्या सरासरीने 618 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके ठोकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो दोनदा शून्यावरही बाद झाला आहे.
मिडिल ऑर्डर
विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. आता या संघातील सर्वात मोठा प्रश्न हा आहे की पाचव्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार? या क्रमांकावर खेळण्यासाठी संघात समाविष्ट असलेला सरफराज खान आणि केएल राहुल यांच्यात चुरशीची लढत पाहिला मिळू शकते. मात्र, व्यवस्थापन केएलसोबत जाईल आणि तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. . त्यामुळे सरफराज खानला कट्ट्यावर बसावे लागले. ऋषभ पंत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळणार हेही निश्चित आहे
बॉलिंग यूनिट
रवींद्र जडेजा, अक्षर पटेल हेही आवश्यकतेनुसार अष्टपैलू म्हणून फलंदाजीला येतील. चेन्नईत स्पिनला मदत मिळते. अशा परिस्थितीत टीम इंडिया 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाजांसह जाऊ शकते. जडेजा आणि अक्षर व्यतिरिक्त रविचंद्रन अश्विन खेळणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना वेगवान आक्रमणात संधी मिळू शकते.
चेन्नई कसोटीत 'ही' असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11 : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.