Pakistan vs England 3rd Test : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 असा सामना जिंकून बरोबरीवर आहेत. तिसरी कसोटी जिंकण्यासाठी पाकिस्तानचा संघ अशा युक्त्या आजमावत आहे ज्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.


मालिकेतील पहिला कसोटी सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, ज्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तान संघाने दमदार पुनरागमन करत 152 धावांनी विजय मिळवला. आता तिसरी कसोटी जिंकण्यासाठी पाकिस्तान संघ रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठे बदल करत आहे.






तिसरा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. खेळपट्टी कोरडी करण्यासाठी मोठे पंखे आणि बाहेरील हीटर्सचा वापर केला जात आहे. रावपिंडीची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. गेल्या सामन्यात पाकिस्तानने आपल्या फिरकी गोलंदाजांच्या जोरावरच सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून नोमान अली आणि साजिद खान यांनी प्रत्येकी 20 बळी घेतले. इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ 144 धावा करता आल्या.






रावळपिंडीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना नाही अनुकूल


रावळपिंडीची खेळपट्टी सामान्यतः सपाट मानली जाते. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना फार कमी मदत मिळते. अशा परिस्थितीत पाकिस्तानी संघ पूर्ण तयारीनिशी या खेळपट्टीला टर्निंग ट्रॅक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. फिरकी चेंडू खेळताना इंग्लंडच्या फलंदाजांना सामान्यत: समस्यांना सामोरे जावे लागते.






मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने सपाट खेळपट्टी बनवली होती. अशा स्थितीत इंग्लिश फलंदाजांनी या मैदानावर भरपूर धावा केल्या होत्या. या सामन्यात हॅरी ब्रूकने इंग्लंडकडून त्रिशतक झळकावले. याशिवाय जो रूटनेही द्विशतक झळकावले, त्यामुळे इंग्लंडने 823/7 धावा करून डाव घोषित केला आणि एक डाव आणि 47 धावांनी सामना जिंकला.


हे ही वाचा -


Jemimah Rodrigues : स्टार क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्स वादाच्या भोवऱ्यात, वडिलांवर धर्मांतराचा आरोप, महिला क्रिकेट क्लबकडून मोठी कारवाई


Commonwealth Games : भारताला मोठा धक्का; हॉकी-शूटिंग, क्रिकेट, बॅडमिंटनसह अनेक स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्समधून बाहेर