Commonwealth Games Update : कॉमनवेल्थ गेम्समधून भारतासाठी मोठी बातमी येत आहे. त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्समधून भारताच्या पदक जिंकण्याच्या शक्यतांना मोठा फटका बसला आहे. यजमान शहर ग्लासगोने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी यासारख्या प्रमुख खेळांना 2026 मध्ये होणाऱ्या गेम्सच्या कार्यक्रमातून काढून टाकले आहे.






खर्च मर्यादित करण्यासाठी टेबल टेनिस, स्क्वॅश आणि ट्रायथलॉन देखील वगळण्यात आले आहेत. बर्मिंगहॅम येथे 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये समाविष्ट नऊ खेळ पुढील गेम्सचा भाग असणार नाहीत. 2026 मध्ये 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. ग्लासगोने यापूर्वी 2014 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते.






"क्रीडा कार्यक्रमात ॲथलेटिक्स आणि पॅरा ॲथलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड),  स्विमिंग आणि पॅरा स्विमिंग, जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो, बोल्स यांचा समावेश आहे. यासोबत एक स्टेटमेंट आणि पॅरा बाऊल्स, 3×3 बास्केटबॉल आणि 3×3 व्हीलचेअर बास्केटबॉल समाविष्ट केले आहेत असे कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने सांगितले.


निवेदनानुसार, "हे खेळ स्कॉटटाउन स्टेडियम, टोलक्रॉस इंटरनॅशनल स्विमिंग सेंटर, एमिरेट्स एरिना आणि स्कॉटिश कॉम्पिटिशन कॉम्प्लेक्स (SEC) या चार ठिकाणी आयोजित केले जातील. खेळाडू आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल.






ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारताच्या पदकांच्या संभाव्यतेसाठी एक मोठा धक्का आहे, कारण याआधी त्यांनी काढलेल्या खेळांमध्ये बहुतेक पदके जिंकली होती. बर्मिंगहॅम गेम्सच्या कार्यक्रमातून शूटिंग देखील काढून टाकण्यात आले होते आणि ते परत येण्याची फारशी आशा दिसत नाही.


हे ही वाचा -


Jemimah Rodrigues : स्टार क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्स वादाच्या भोवऱ्यात, वडिलांवर धर्मांतराचा आरोप, महिला क्रिकेट क्लबकडून मोठी कारवाई


Prithvi Shaw: लठ्ठपणा वाढला, शरीरात 35 टक्के चरबी; पृथ्वी शॉला अजिंक्य रहाणेच्या संघातून दाखवला बाहेरचा रस्ता