ENG vs PAK 3rd Test: मायदेशात पाकिस्तानच्या संघाचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडविरुद्ध 3-0 नं कसोटी मालिका गमावली
ENG vs PAK 3rd Test: कराची (Karachi) येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडनं पाकिस्तानचा (England Beat Pakistan) आठ विकेट्स राखून पराभव केला.
ENG vs PAK 3rd Test: कराची (Karachi) येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडनं पाकिस्तानचा (England Beat Pakistan) आठ विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा क्लीन स्वीप केला. इंग्लंडनं रावळपिंडीत खेळला गेलेला पहिला कसोटी सामना 74 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानला 26 धावांनी धुळ चारत मालिकेवर कब्जा केला. इंग्लंडनं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा क्लीन स्वीप केला. याशिवाय, पहिल्यांदात पाकिस्तानच्या संघाला घरच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळाला आहे.
तिसऱ्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 304 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं 354 धावा केल्या आणि 50 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पाकिस्ताननं 216 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 167 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पाकिस्तानकडून मिळालेलं लक्ष्य इंग्लंडच्या संघानं आठ विकेट्स राखून पूर्ण केलं.
ट्वीट-
A 3-0 series whitewash!! 🦁🦁🦁
— England Cricket (@englandcricket) December 20, 2022
WHAT. A. TEAM.
🇵🇰 #PAKvENG 🏴 pic.twitter.com/wHbbq6SiyC
ट्वीट-
The first Test team to ever win a clean sweep in Pakistan 🌟
— England Cricket (@englandcricket) December 20, 2022
🇵🇰 #PAKvENG 🏴 pic.twitter.com/cz8cQhyFln
बाबर आझमची खास विक्रमाला गवसणी
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात बाबर आझमनं उत्कृष्ट 78 धावांची खेळी केली. या कामगिरीसह त्यानं यंदाच्या वर्षातील 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. कॅलेंडर वर्षात 1000 कसोटी धावा करणारा बाबर आझम हा पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे. त्यानं इंझमाम-उल-हकचा विक्रम मोडीत काढला, ज्यानं 2005 मध्ये सात कसोटी सामन्यांत 999 धावा केल्या होत्या.कॅलेंडर वर्षात बाबर आझमनं 8 कसोटी सामन्यात 67.26 च्या सरासरीनं 1009 धावा केल्या आहेत.ज्यात तीन शतक आणि सात अर्धशतकांची नोंद आहे. यादरम्यान 196 त्याची सर्वोत्तम वयैक्तिक धावसंख्या आहे, ज्या त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची कसोटी सामन्यात केल्या.
पाकिस्तानचा संघ-
अब्दुल्ला शफीक, शान मसूद, अझहर अली, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), आगा सलमान, सौद शकील, फहीम अश्रफ, नौमान अली, मोहम्मद वसीम जूनियर, अबरार अहमद, इमाम-उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद अली, जाहिद महमूद, सर्फराज अहमद.
इंग्लंडचा संघ-
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (डब्ल्यूके), रेहान अहमद, ऑली रॉबिन्सन, मार्क वुड, जॅक लीच, विल जॅक्स, जेम्स अँडरसन, जेमी ओव्हरटन, कीटन जेनिंग्स.
हे देखील वाचा-