ENG vs IND Head to Head Record: इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय तीन सामन्यांची (England vs India) एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 12 जुलै 2022 म्हणजेच उद्या लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) मैदानावर खेळला जाणार आहे. सध्या भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर, दुसरीकडं इंग्लंडनं गेल्या काही वर्षात एकदिवसीय क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीत बदल केलाय. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.
भारत-इंग्लंड हेड टू हेड रेकॉर्ड
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंडचा संघ आतापर्यंत 103 वेळा आमने सामने आले आहेत. यातील 55 सामने भारतानं तर, 43 इंग्लंडनं जिंकले आहेत. याशिवाय, दोन सामने अनिर्णित आणि तीन सामन्यांचा निकाल नाही लागला. भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटची एकदिवसीय मालिका 2021 मध्ये खेळली गेली होती. त्यावेळी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं 2-1 नं विजय मिळवला होता.
भारत -इंग्लंड एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै 2022 | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै 2022 | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै 2022 | मँचेस्टर |
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शिखन धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
इंग्लंडचा संघ-
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओव्हरटन, मॅथ्यू पार्किंसन, जो रूट, जेसन रॉय, फिल साल्ट, बेन स्टोक्स, रीसे टॉपली, डेविड व्हिली.
हे देखील वाचा-
- Rohit Sharma Tweet: रोहित शर्माची भविष्यवाणी ठरतेय खरी, 10 वर्षापूर्वी सूर्यकुमारबाबत केलेलं ट्वीट होतंय व्हायरल
- IND vs ENG 3rd T20: रोहित शर्मानं सूर्यकुमारचं कौतूक तर केलंच! पण पराभवाचंही सांगितलं कारण
- ENG vs IND: 'विचार करूनच निर्णय घेतले जातात' विराटच्या खराब फॉर्मवर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया