Sri Lanka Economical Crisis: श्रीलंकेला सध्या खराब राजकारण आणि आर्थिक संकाटाला सामोरे जावा लागतंय. ज्यामुळं श्रीलंकेतील नागरिकांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, श्रीलंकेतील संतप्त नागरिकांनी आंदोलन पुकारत राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानावर अतिक्रमण केलं आहे. या संकटाच्या काळात  श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूं सामान्य लोकांना पाठिंबा दर्शवत अंदोलनात सहभागी झाले. याच दरम्यान, श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यानं मदत आणि समर्थनासाठी सनथ जयसूर्यानं भारताचे आभार मानले आहेत. 


सनथ जयसूर्यानं काय म्हटलंय?
"आर्थिक संकटाच्या सुरुवातीपासूनच भारतानं श्रीलंकेला मदत आणि मदत केली आहे, त्यामुळं आम्ही भारताचे आभारी आहोत. या संकटात भारताने मोठी भूमिका बजावली आहे. मला वाटते की श्रीलंकेत काय चालले आहे? याकडे सर्व देश बारकाईनं लक्ष ठेवून आहेत", असं श्रीलंकेचा माजी क्रिकेटपूट सनथ जयसूर्यानं म्हटलं आहे. 


एनआयचं ट्वीट-



नागरिकांना शातंता राखण्याचं आवाहन
"देशावरील राजकीय संकट दूर झालं असून नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावं", असं आवाहन श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल शैवेंद्र सिल्वा यांनी केलं. सध्याच्या प्रश्नांवर शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढण्याची संधी आता उपलब्ध आहे, असंही त्यांनी म्हटलंय. तसेच श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानी घुसलेल्या आंदोलकांना तेथे एक कोटी 78 लाख रुपये सापडले. आंदोलकांनी ही रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिली.


हे देखील वाचा-