IND vs IRE,1st T20 : भारतीय संघ आज आयर्लंड विरुद्ध पहिला टी20 सामना खेळला. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला असून हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंच्या फौजेने हा विजय मिळवला आहे. पावसामुळे सामना 12 ओव्हर्सचा करण्यात आला होता. अशामध्ये दोन्ही संघानी प्रत्येकी 12 ओव्हर खेळल्या, ज्यात आधी आयर्लंडने 108 धावा करत 109 धावांचं आव्हान भारताला दिलं. जे भारताने 9.2 षटकात पूर्ण करत सामना जिंकला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs IRE 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर 108 धावांत आयर्लंडला रोखत 109 धावा 9.2 षटकात पूर्ण करत सामना जिंकला.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताच्या दीपक हुडाने अप्रतिम फलंदाजी केली. पण आयर्लंडच्या हॅरी टेक्टरची एकहाती झुंजही अप्रतिम होती.
- नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेणाऱ्या मुंबईने पहिल्या षटकातचआयर्लंडच्या सलामीवीर कर्णधार अँन्ड्रूला तंबूत धाडलं.
- त्यानंतर एका मागोमाग एक गडी भारतीय फलंदाज बाद करतच होते. पण हॅरी टेक्टरने एकहाती झुंज देत 64 धावांची तुफान खेळी केली.
- हॅरीच्या याच खेळीच्या जोरावर आयर्लंडने भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले.
- भारताकडून हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, चहल आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
- 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कऱण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून ईशानने चांगली सुरुवात केली.
- पण 26 धावा करुन तो बाद झाला. क्रेग यंगने त्याला बाद केलं.
- त्यानंतर मात्र हार्दिकने दीपकसोबत मिळून तुफान फलंदाजी केली. हार्दिक 24 धावा करुन बाद झाला.
- पण दीपकने नाबाद 47 धावांची खेळी करत भारताला 9.2 षटकात विजय मिळवून दिला..
हे देखील वाचा-