IND vs WI, 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. हा निर्णय कर्णधार शिखरसह सलामीवीर गिलने योग्य ठरवत तुफान सुरुवात केली. शिखर अर्धशतक झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला आहे. पण सामन्यात सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात विलंब होत आहे. अशामध्ये दोन्ही संघाना प्रत्येकी 40 ओव्हर खेळवल्या जाणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.
दोन्ही संघात महत्त्वाचे बदल
या सामन्यासाठी दोन्ही संघानी मागील सामन्यातील संघ खेळवला नसून बदल केला आहे. यावेळी भारतीय संघात केवळ एक बदल झाला आहे. आवेश खानच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी मिळाली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजमध्ये त्यांचा स्टार अष्टपैलू जेसन होल्डर जो कोरोनातून सावरुन आता संघात परतला आहे. वेस्ट इंडीजने जेसनसह आणखी दोन खेळाडू संघात घेतले आहेत. यामध्ये केसी कार्टी आणि किमो पॉल याचं नाव आहे. या तिघांच्या जागी संघात रोव्हमेन पॉवेल, रोमारियो शेफर्ड आणि अल्झारी जोसेफ यांना विश्रांती देण्यात आली आहे. नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया...
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, केसी कार्टी, अकिल होसेन, जेसन होल्डर, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, हेडन वॉल्श, किमो पॉल, जयडेन सील्स
हे देखील वाचा-
- IND vs WI, 3rd ODI Playing 11 : वेस्ट इंडीजचा स्टार जेसन होल्डर संघात, भारतीय संघातही एक बदल, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11
- ODI ranking : विराट कोहलीचं दृष्टचक्र संपेना, 7 वर्षांत सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारी, रोहितची रॅकिंगही घसरली
- BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार