IND vs WI, 3rd ODI : भारतीय संघ आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या अखेरच्या सामन्याला सुरुवात होत असून दोन्ही संघानी आपले अंतिम संघ जाहीर केले आहेत. यावेळी भारतीय संघात केवळ एक बदल झाला आहे. आवेश खानच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी मिळाली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजमध्ये त्यांचा स्टार अष्टपैलू जेसन होल्डर जो कोरोनातून सावरुन आता संघात परतला आहे.


वेस्ट इंडीजने जेसनसह आणखी दोन खेळाडू संघात घेतले आहेत. यामध्ये केसी कार्टी आणि किमो पॉल याचं नाव आहे. या तिघांच्या जागी संघात रोव्हमेन पॉवेल, रोमारियो शेफर्ड आणि अल्झारी जोसेफ यांना विश्रांती देण्यात आली आहे. नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया...


भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज.



वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, केसी कार्टी, अकिल होसेन, जेसन होल्डर, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, हेडन वॉल्श, किमो पॉल, जयडेन सील्स 




भारत व्हाईट वॉश देण्यासाठी सज्ज



मालिकेतील पहिला सामना भारताने अवघ्या 3 धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अगदी रोमहर्षक असा दोन विकेट्सच्या फरकाने भारताने विजय मिळवला. पण मालिकेतील 3 पैकी 2 सामने भारताने जिंकल्याने मालिका भारताच्याच नाववर आहे. पण आजचा सामना जिंकून भारत विंडीजला त्यांच्यात भूमीत व्हाईट वॉश देऊ शकतो. दुसरीकडे वेस्ट इंडीज किमान शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.