IND vs SL, 2nd T20 Live Streaming: श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (India vs Sri Lanka) भारतानं दणदणीत विजय मिळवला. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 62 धावांनी श्रीलंकेला पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघातील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येणार याबाबत जाणून घेऊयात.


 


 


भारत-श्रीलंका दुसरा टी-20 ना कधी, कुठे आणि कसा पाहायचा?
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना 26 फेब्रुवारी (शनिवारी) रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, संध्याकाळी सात वाजता टॉस होईल. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर आजचा सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध वेस्ट श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्याचे लाईव्ह प्रसारण 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क'वर पाहता येईल. भारत- श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहता येणार आहे.


कोणाचं पारड जड?
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 15 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे. 


अखेरचे दोन सामने कुठे खेळले जाणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. तीन सामन्याच्या मालिकेतील अखेरचे दोन्ही टी-20 सामने धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळण्यात येणार आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha