Donald Trump US President Virat Kohli Connection : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा निवडणूक जिंकणारे ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते. डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यानंतर सगळीकडे फक्त यांच्या विजयाचीच चर्चा होत आहे आणि या चर्चेदरम्यान लोकांनी विराट कोहलीचे कनेक्शन जोडले आहे.


ट्रम्प-कोहली काय आहे कनेक्शन?


यासंदर्भात अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात ट्रम्प यांचा विजय विराट कोहलीसाठी 'ट्रम्प कार्ड' ठरणार का? ट्रम्प जिंकल्यास कोहलीचे नशीब खरेच चमकणार आहे का? असे का सांगितले जात आहे हे जाणून घेईया... खरंतर, ट्रम्पच्या विजयानंतर सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प गेल्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तेव्हा कोहली यांनी दोन वर्षांत 22 शतके ठोकली होती. 






ट्रम्प 2017 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते आणि कोहलीने पुढील दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 शतके झळकावली होती. 2017 च्या एका कॅलेंडर वर्षात 10 शतके करणारा तो पहिला कर्णधार बनला. कोहलीने 2018 मध्ये पुन्हा 37 सामन्यात 11 शतके झळकावली.






भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून जवळपास एक वर्ष झाले. कोहलीने गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2023 रोजी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. ज्यामध्ये त्याने 117 धावांची इनिंग खेळली होती. यानंतर कोहलीने आयपीएल 2024 मध्ये शतक झळकावले, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला शतक झळकावता आले नाही.






2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही कोहलीला शतक करता आले नव्हते. तर 2024 च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कोहली फेल ठरला. नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकाही कोहलीची बॅट शांत होती. या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत कोहली बॅटने संघर्ष करताना दिसला, ज्यामुळे संघ अडचणीत आला.  






हे ही वाचा -


Shreyas Iyer : श्रेयस अय्यरचा रणजी ट्रॉफीत धुमधडाका! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर BCCI देणार वाइल्ड कार्ड एन्ट्री?