ICC Test Rankings Update : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दारूण पराभवानंतर आयसीसीने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला थोडा फायदा झाला आहे, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना दणका बसला आहे. दोन्ही स्टार आता टॉप 10 पासून खूप लांब गेले आहेत.


आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट अजूनही पहिल्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 903 आहे. सध्या त्याच्यासमोर कोणतेही आव्हान नाही. कारण केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग 804 आहे. म्हणजेच पहिला आणि दुसरा फलंदाज यांच्यातील फरक बराच मोठा आहे, ज्यावर मात करणे सोपे नाही. यानंतर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 778 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.


यशस्वी जैस्वाल एक स्थान खाली, पंतने घेतली झेप 


यशस्वी जैस्वाल न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत काही विशेष करू शकला नाही, त्यामुळेच तो आता एका स्थानाने घसरून चौथ्या क्रमांकावर आला आहे, त्याचे रेटिंग आता 777 आहे. स्टीव्ह स्मिथ अजूनही 757 च्या रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतने मुंबई कसोटीत इतर फलंदाजांच्या तुलनेत सरस कामगिरी केली होती, त्याचाच फायदा त्याला यावेळी क्रमवारीत झाला. त्याने आता पाच स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 750 झाले आहे. या दोघांशिवाय भारताचा एकही फलंदाज टॉप 10 मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.


विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी तो एकूण 8 स्थानांनी खाली गेला आहे. त्याचे रेटिंग 655 पर्यंत घसरले असून तो 22 व्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर तो थेट 26 व्या क्रमांकावर गेला आहे. त्याचे रेटिंग सध्या 629 आहे. याचाच अर्थ आता या दोघांनाही टॉप 10 मध्ये परतणे खूप कठीण जाणार आहे. किमान दोन मोठ्या डावांतच हे घडू शकते.






हे ही वाचा -


Ind A vs Aus A 2nd Unofficial Test : KL राहुलला संधी; इशान किशन बाहेर! भारत-ऑस्ट्रलिया सामना कधी कुठे पाहाल Live?


IPL 2025 Mega Auction : पंत-अय्यरसह 23 भारतीय खेळाडू 2 कोटींच्या ड्राफ्टमध्ये! सर्फराजने मूळ किंमत केली कमी, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट