DJ Bravo Creates History: वेस्ट इंडीजा माजी ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) टी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. ड्वेन ब्राव्होनं टी-20 क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेऊन इतिहास रचलाय. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये 600 विकेट्सचा टप्पा ओलांडणारा ड्वेन ब्राव्हो पहिला खेळाडू ठरलाय. ज्यामुळं सोशल मीडियावर ड्वेनं ब्राव्होच्या नावाची चर्चा सुरु झालीय. 


ड्वेन ब्राव्होला जगभरातील अनेक टी-20 लीग मध्ये खेळताना पाहिलं आहे. आयपीएलचं नव्हे तर, इतर टी-20 लीगमध्येही त्यानं चमक दाखवली आहे. आयपीएलमध्ये सध्या चेन्नईच्या संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ड्वेन ब्राव्होनं आयपीएलमध्ये एकूण 161 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 23.83 च्या सरासरीनं आणि इकोनॉमी 8.39 मदतीनं 183 विकेट्स घेतले आहेत.


ट्वीट-



आयपीएलमध्ये ब्राव्होचं दमदार प्रदर्शन
चेन्नईचा ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होनं 161 सामन्यात 1 हजार 560 धावा केल्या आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 70 धावा आहे. आयपीएलमध्ये ड्वेन ब्रावोचा स्ट्राइक रेट 129.57 आहे. तर, सरासरी 22.61 आहे. याशिवाय तो 44 वेळा नाबाद राहिलाय. वेस्ट इंडिजसाठी 91 टी-20 सामन्यांमध्ये ड्वेन ब्राव्हो 78 विकेट घेतल्या आहेत.


ड्वेन ब्राव्होचा आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
ड्वेन ब्राव्होनं 25 ऑक्टोबर 2018 मध्ये ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु, तो अजूनही जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळताना दिसत आहे. ब्राव्होनं 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 40 कसोटी, 164 एकदिवसीय आणि 66 टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केलंय. त्यानं सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. ब्राव्होनं 2010 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो टी-20 स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानं भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि स्थानिक टी-20 लीगमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. विंडीज मंडळाबरोबर झालेल्या वादानंतर त्यानं विंडीजकडून न खेळण्याचा निर्णय घेतला होता.


हे देखील वाचा-