Devon Conway to miss NZ vs ENG 3rd Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकण्यात भारताला यश आले. मात्र भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दोन सामन्यानंतर मालिका 1-1 अशी बरोबरी आहे. दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. 


पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील तिसरा सामना 14 डिसेंबरला होणार आहे. मात्र याआधीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला असून स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे.


सलामीवीर फलंदाज डेव्हन कॉनवे इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळला, ज्यामध्ये त्याला मोठी खेळता आली नाही. चार डावात फक्त 21 धावा करता आल्या. आता तो तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. कारण तो बाबा होणार आहे. त्याच्या जागी मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे.




मार्क चॅपमनने अद्याप न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पण केलेले नाही. पण या 30 वर्षीय फलंदाजाने एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. चॅपमनने आतापर्यंत 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 564 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. याशिवाय 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1551 धावा आहेत.


इंग्लंडविरुद्ध त्याच्याच घरात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील किवी संघाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पहिल्या कसोटीत संघाला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच वेळी, दुसऱ्या कसोटीही इंग्लंडने दुसरी कसोटी 323 धावांनी जिंकली. इंग्लिश गोलंदाजांसमोर दोन्ही डावात किवी फलंदाजांनी गुडघे टेकले. पहिल्या डावात अवघ्या 125 धावा करून संपूर्ण संघ कोलमडला, तर दुसऱ्या डावात किवींना मोठ्या मुश्किलीने 259 धावांपर्यंत मजल मारता आली. टॉम ब्लंडेल दुसऱ्या डावात संघासाठी एकटाच लढताना दिसला आणि त्याने शतक झळकावले. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून उर्वरित फलंदाजांची साथ मिळू शकली नाही.


हे ही वाचा -


Ban vs Ind U19 Asia Cup : टीम इंडियाचं स्वप्न भंगलं! फायनलमध्ये वैभव सूर्यवंशी फेल, बांगलादेशने जिंकला 'आशिया कप'