Deepak Chahar : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरु (India vs Zimbabwe) एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर दीपक चाहरने केलेल्या एका कृतीमुळे चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे. चाहरने प्रसिद्ध अशा मकडिंग स्टाईलने विकेट घेण्याचा प्रयत्न केला, विशेष म्हणजे त्याने योग्यरित्या विकेटही घेतली पण अपील न करत सर्वांचीच मनं जिंकली. त्यामुळे दीपकनं आपल्या कमाल खेळासह मोठ्या मनाचा प्रत्यय आणून दिला आहे.
दरम्यान दीपकच्या या कृतीनंर ट्वीटरवर चर ट्वीट्सता पाऊस पडताना दिसत आहे. यातील काही ट्वीटमध्ये एक मजेशीर गोष्ट लिहिली आहे. ती म्हणजे 'चाहरने मंकडिंग करण्याचा प्रयत्न केलेल्या खेळाडूचं नाव इनोसंट कैया (Innocent Kaia) असं असल्याने इनोसंटचा अर्थ भोळा किंवा काहीही न केलेला असंही होत असल्याने त्यामुळेच चाहरने अपील केली नाही.'
झिम्बाब्वेसमोर 290 धावाचं आव्हान
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताच्या डाव पुढे नेला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी झाली. भारताची धावसंख्या 63 वर असताना केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. या सामन्यात केएल राहुल 46 चेंडूत 30 धावा करून माघारी परतला. ब्रॅडली इवांसनं त्याला बाद केलं. त्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं इशान किशनसोबत 140 धावांची शतकी भागेदारी करत संघाचा डाव सावरला. ईशान किशन 50 धावा करुन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं 130 धावा केल्या. ज्यामुळे भारतानं 289 धावा करत झिम्बाब्वेला 290 धावाचं आव्हान दिलं आहे.
पहिल्या सामन्यात सामनावीर
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने 10 विकेट्सनी जिंकला होता. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या दीपक चाहरला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने सामन्यात 7 षटकांत केवळ 27 रन देत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. या कामगिरीनंतर त्याला आशिया कप तसंच आगामी टी20 विश्वचषकासाठीही संघात घ्या अशा मागणीला उधाण आलं आहे. दीपक हा एक युवा वेगवान गोलंदाज असून चेन्नई सुपरकिंग्सचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. पण मागील काही काळापासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. पण आता झिम्बाब्वे दौऱ्यात त्यानं दमदार पुनरागमन केलं आहे. दुसऱ्या सामन्यात विश्रांतीनंतर तिसऱ्या सामन्यातही त्याने चमकदार कामगिरी केली आहे.
हे देखील वाचा-