David Johnson: टीम इंडियाचा माजी कसोटीपटू डेविड जॉनसन यांचं टोकाचं पाऊल, जीवन संपवलं
David Johnson Career: भारताचा माजी कसोटीपटू डेविड जॉनसन यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. जॉनसन यांचं वय 53 वर्ष होतं. अनिल कुंबळेनं डेविड जॉनसनच्या निधनावर पोस्ट केली आहे.
David Johnson Deathनवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 8 मधील मॅचची चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. डेविड जॉनसन या माजी कसोटीपटूनं जीवन संपवल्याची माहिती आहे. खासगी अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन डेविड जॉनसन यांनी जीवन संपवलं. भारताचा माजी क्रिकेटपटू डेविड जॉनसन यांचं वय 53 वर्ष होतं. भारताचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे यांनी डेविड जॉनसन यांच्या निधनाबद्दल ट्विट केलं आहे. अनिल कुंबळे यांनी डेविड जॉनसन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
डेविड जॉनसन यांनी 1996 मध्ये भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले होते. डेविड जॉनसन यांच्या निधनानं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. अनिल कुंबळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करुन माझा क्रिकेटमधील सहकारी डेविड जॉनसन याच्या निधनाची बातमी दु:खद असल्याचं म्हटलं. डेविड जॉनसन यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना अनिल कुंबळे यांनी व्यक्त केल्या आहेत. डेविड जॉनसन यांच्यासाठी टोपणनाव बेन्नी वापरत लवकर निघून गेला, असं म्हटलं आहे.
अनिल कुंबळे यांचं ट्विट
Saddened to hear the passing of my cricketing colleague David Johnson. Heartfelt condolences to his family. Gone too soon “ Benny”!
— Anil Kumble (@anilkumble1074) June 20, 2024
डेविड जॉनसन यांचं करिअर लवकर संपलं होतं. भारताकडून त्यांनी 10 ऑक्टोबर 1996 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिल्लीतील कसोटी मॅचमध्ये पदार्पण केलं होतं. डेविड जॉनसन यांनी भारतासाठी शेवटची कसोटी 26 डिसेंबर 1996 ला खेळली होती. त्यानंतर डेविड जॉनसन यांना संधी मिळाली नव्हती. अनिल कुंबळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करुन माझा क्रिकेटमधील सहकारी डेविड जॉनसन याच्या निधनाची बातमी दु:खद असल्याचं म्हटलं. डेविड जॉनसन यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना अनिल कुंबळे यांनी व्यक्त केल्या आहेत. डेविड जॉनसन यांच्यासाठी टोपणनाव बेन्नी वापरत लवकर निघून गेला, असं म्हटलं आहे.
जय शाह यांचं ट्विट
अनिल कुंबळे प्रमाणं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी देखील डेविड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Deepest condolences to family and friends of our former Indian fast bowler David Johnson. His contributions to the game will always be remembered 🙏
— Jay Shah (@JayShah) June 20, 2024
भारतीय संघात डेविड जॉनसन यांना संधी मिळाली नव्हती. मात्र, देशांतर्गत क्रिकेट आणि लीग क्रिकेटमध्ये खेळत होते. डेविड जॉनसन यांच्या टोकाच्या पावलामुळं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. डेविड जॉनसन यांनी हे पाऊल का उचललं हे अद्याप समोर आलं नाही.
संबंधित बातम्या :