Dale Steyn Sunrisers Hyderabad IPL 2025 : आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे आणि त्यापूर्वी सर्व फ्रँचायझी खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करणार आहेत. त्यामुळे संघांचे चित्र निक्कीच बदलले असणार आहे. सर्व फ्रँचायझी मेगा लिलावाच्या तयारीत व्यस्त आहेत. प्रशिक्षक, कर्णधार बदलण्यापासून ते खेळाडूंच्या कायम ठेवण्याच्या यादीपर्यंत फ्रँचायझी तयार करत आहे. दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावणाऱ्या डेल स्टेनने एक मोठा निर्णय घेत काव्या मारनच्या संघातून बाहेर पडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. डेल स्टेनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या एका पोस्टद्वारे ही माहिती दिली, ज्यामध्ये त्याने स्पष्टपणे लिहिले की तो आयपीएल 2025 साठी येणार नाही.


सनरायझर्स हैदराबादने डेल स्टेनची डिसेंबर 2021 मध्ये संघाचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती, त्यानंतर त्याने सलग तीन हंगाम ही जबाबदारी सांभाळली. गेल्या आयपीएल हंगामात डेल स्टेनने हैदराबाद संघाचा नवा कर्णधार पॅट कमिन्ससोबत काम केले, ज्यामध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला. डेल स्टेनने पोस्ट करून म्हटले की, मी आयपीएल 2025 साठी येणार नाही. तथापि, मी दक्षिण आफ्रिकेतील SA20 मध्ये सनरायझर्स इस्टर्न केपसोबत काम करत राहीन. SA20 दोनदा जिंकणारा सनरायझर्स इस्टर्न केप सलग तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल.






सनरायझर्स हैदराबाद संघाने 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामापूर्वी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये अनेक मोठे बदल केले होते, ज्यामध्ये डॅनियल व्हिटोरीला नवीन मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी डेल स्टेनला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले. आता या पदावर सनरायझर्स हैदराबाद संघ कोणाची नियुक्ती करतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


स्टेन आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात लायन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि डेक्कन चार्जर्स या चार संघांसाठी क्रिकेट खेळला होता. स्टेनने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात पहिल्या सत्रात आरसीबीकडून केली होती.


आफ्रिकन वेगवान गोलंदाजाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 95 सामने खेळले. या सामन्यांच्या 95 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 25.85 च्या सरासरीने 97 विकेट घेतल्या.


हे ही वाचा -


Ind vs Nz 1st Test : भारताने जिंकली नाणेफेक, संघात दोन मोठे बदल, बेंगळुरूमध्ये रोहितने 'या' खेळाडूंना दिली संधी


IND vs NZ 1st Test Day-2 Weather Update : बंगळुरूमध्ये दुसऱ्या दिवशीही इंद्रदेवचा मूड खराब? नाणेफेक होणार का? जाणून घ्या हवामान रिपोर्ट