India vs New Zealand 1st Test day-2 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. बुधवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. नाणेफेकही झाले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सामना सुरू झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. बांगलादेशविरुद्ध शेवटची कसोटी खेळलेल्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. शुभमन गिल 100 टक्के फिट नाही. त्याच्या जागी सरफराज खानचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज आकाश दीपच्या जागी कुलदीप यादव प्लेइंग-11 मध्ये परतला आहे.


टॉम लॅथम म्हणाला, 'खेळपट्टी झाकून ठेवली गेली आहे, त्यामुळे आशा आहे की आम्ही सुरुवातीला बॉलचा चांगला वापर करू. हवामान खराब आहे, त्यामुळे आम्ही येथे चांगली तयारी करू शकलो नाही. एजाज पटेलसोबत तीन वेगवान खेळतील. आमच्याकडे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत जे फिरकी गोलंदाजीही करतात.


दुसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे झाले तर, तो सकाळी 9.15 वाजता सुरू होईल. दिवसाचे पहिले सत्र सकाळी 11.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दिवसाचे दुसरे सत्र दुपारी 12.10 ते 02.25 पर्यंत चालेल. तिसरे आणि शेवटचे सत्र दुपारी 02.45 ते 04.45 पर्यंत चालेल.


विराट कोहलीला विशेष विक्रम करण्याची संधी आहे. तो 9000 कसोटी धावा पूर्ण करू शकतो. यासाठी कोहलीला फक्त 53 धावा करायच्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कोहलीने या वर्षात गेल्या सहा डावांत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्याला न्यूझीलंडविरुद्ध चमत्कार करण्याची संधी आहे.  


भारत-न्यूझीलंड कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन -


भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.


न्यूझीलंड : टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, एजाझ पटेल, विल्यम ओ'रुर्के.


हे ही वाचा -


IND vs NZ 1st Test Day-2 Weather Update : बंगळुरूमध्ये दुसऱ्या दिवशीही इंद्रदेवचा मूड खराब? नाणेफेक होणार का? जाणून घ्या हवामान रिपोर्ट


Rohit Sharma : मुंबई इंडियन्स चार जणांना रिटेन करणार, रोहित शर्माबाबत काय ठरलं? लखनौचं केएल राहुल बाबत तळ्यात मळ्यात