IND vs NZ Test Day-2 Bengaluru Weather Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस खलनायक ठरला ज्यामुळे नाणेफेकही होऊ शकले नाही. दिवसभर मुसळधार पाऊस पडला आणि दोन्ही संघांचे खेळाडू ड्रेसिंग रूममधून मैदानाकडे बघत राहिले. तुम्हीही या कसोटी सामन्याचा आनंद घेण्यासाठी बेंगळुरूला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खंरतर, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंद्रदेवचा मूड खराब असणार आहे, ज्यामुळे सामन्याची मजा खराब होऊ शकते.
भारत आणि न्यूझीलंड कसोटीतील दुसऱ्या दिवशी हवामान कसे असेल?
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही हवामान खराब असणार आहे. Accuweather च्या अहवालानुसार, दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण राहील आणि सकाळी जोरदार पाऊस पडू शकतो. एवढेच नाही तर दिवसभरातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चिन्नास्वामी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच दुसऱ्या दिवशीही नाणेफेक ठरलेल्या वेळेवर पडण्याची शक्यता फारच कमी आहे.
दुसऱ्या दिवशाची BCCIने बदलली वेळ
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी 9 वाजता नाणेफेक होणार होती. सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होणार होता, पण पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या वेळीत मोठा बदल केला आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी 9.15 पासून पहिले सत्र सुरू होईल. जे साडेअकरा वाजेपर्यंत असेल. मग दुपारच्या जेवणानंतर सामना पुन्हा 12.10 वाजता सुरू होईल. जो दुपारी 2.25 पर्यंत सुरू असले. यानंतर दिवसाचे तिसरे आणि शेवटचे सत्र दुपारी 2:45 वाजता सुरू होईल आणि 4:45 पर्यंत चालेल.
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचा विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंडचे संघ आतापर्यंत 62 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यापैकी टीम इंडियाने 22, तर किवी संघाने 13 कसोटी सामने जिंकले आहेत. त्याच वेळी 27 सामने अनिर्णित राहिले आहेत. न्यूझीलंडने 1988 साली भारतीय भूमीवर शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. किवी संघाने भारतात आतापर्यंत एकूण 12 कसोटी मालिका खेळल्या आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 10 जिंकल्या आहेत, तर 2 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. न्यूझीलंडने 20 वर्षांपूर्वी भारताविरुद्ध शेवटची कसोटी मालिका अनिर्णित ठेवली होती.
हे ही वाचा -