KL Rahul & Athiya Shetty Announce Charity Venture Auction : भारताचा स्टार क्रिकेटपटू के एल राहुल सध्या टीम इंडियाचा भाग आहे. सध्या टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. श्रीलंकेत भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे. दरम्यान, के एल राहुल क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना दिसतो. शिवाय तो समाजसेवेतही इतरांच्या तुलनेत एक पाऊल पढे आहे. के एल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी एका चॅरिटी व्हेंचरची घोषणा केली आहे. या दाम्पत्याकडून विपला फाऊंडेशनसाठी आर्थिक निधी गोळा केला जाणार आहे. त्यांच्या या अपक्रमात भारताच्या तसेच परदेशातीलही अनेक क्रिकेटपटू सामील झाले आहेत.
के एल राहुल आणि अथिया यांचे खास अभियान
या चॅरिटी व्हेंचरचे नाव 'क्रिकेट फॉर अ कॉज' असे आहे. या व्हेंचरच्या माध्यमातून के एल राहुल आणि अथिया एका खास क्रिकेट लिलावाचे (क्रिकेट बोली) आयोजन करणार आहेत. या बोलीमध्ये भारताच तसेच जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू त्यांच्या आवडत्या वस्तू निलामीसाठी देणार आहेत. या लिलावातून मिळालेल्या निधीचा विपला फाऊंडेशनला देण्यात येणार आहे.
अनेक दिग्गज क्रिकेटर होणार सहभागी
के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या या अभियानात राहुल द्रविड़, एमएस धोनी, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, लखनौ सुपर जायंट्स यांच्यासह जॉस बटलर, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनी सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट फॉर द कॉज या उपक्रमाअंतर्गत 23 ऑगस्ट रोजी लिलाव आयोजित केली जाईल.
राहुल-अथिया नेमकं काय म्हणाले?
या उपक्रमाबद्दल अथिया शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. लहानपणापासून विपला फाऊंडेशन माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग राहिलेले आहे. मी याआधी मुलांना शिकवण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवलेला आहे. या लिलावाच्या माध्यमातून मी माझ्या आजीच्या वारशाला पुढे घेऊन जाणार आहे. ज्या लहान मुलांना ऐकता येत नाही आणि बौद्धिकदृष्ट्या जे दिव्यांग होते, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विपला फाऊंडेशनची सुरुवात केली होती, असे अथिया शेट्टी म्हणाली. तर या उपक्रमासाठी मी क्रिकेट विश्वातील लोकांशी संपर्क केला तेव्हा त्यांनीदेखील त्यांचा मौल्यवान वेळ मला देण्याची तयारी दाखवली. लिलावात सहभागी होणारा प्रत्येकजण या लिलावाच्या माध्यमातून आमच्याशी जोडला जाणार आहे, असे के एल राहुल म्हणाला.
हेही वाचा :
Shubman Gill : शुभमन गिलचं वनडेतील स्थान धोक्यात येईल.. पाकिस्तानच्या माजी कॅप्टनचा सूचक इशारा