IND vs SL 2nd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये दुसरी वनडे, मॅच कधी सुरु होणार, लाईव्ह कुठे पाहणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना दुपारी अडीच वाजता सुरु होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच टाय झाली होती. भारतीय संघ दुसऱ्या वनडेत विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मॅच टीव्हीवर सोनीच्या स्पोर्टस चॅनेलवर पाहता येईल. सोनी स्पोर्टस टेन 1, सोनी स्पोर्टस टेन 5 (इंग्लिश). सोनी स्पोर्टस टेन 3 (हिंदी) वर पाहता येईल.
भारत आणि श्रीलंका याच्यातील मॅचची कॉमेंट्री इंग्रजी, हिंदीसह तेलुगु आणि तामिळ भाषेत केली जाईल. टीव्हीसह ही मालिका सोनी लाईव्ह वर पाहता येईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच टाय झाली होती. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 230 धावा केल्या होत्या. भारतीय संघानं 47.5 ओव्हरमध्ये सर्वबाद 230 धावा केल्या आणि मॅच ड्रॉ झाली. रोहित शर्मानं पहिल्या वनडेत अर्धशतक केलं. तर, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल आणि शिवम दुबे चांगली सुरुवात करुनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.