कोलंबो : भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर यांनी टीम इंडियाचा (Team India) उपकर्णधार म्हणून शुभमन गिलवर (Shubman Gill) जबाबदारी सोपवली. त्यापूर्वी झिम्बॉब्वे दौऱ्यात शुभमन गिलकडे भारताच्या संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं होतं. शुभमन गिल हा भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून अनेक जण त्याच्याकडे आशेने पाहतात. मात्र, काही सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर शुभमन गिलला मोठी खेळी करण्यात अपयश येत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट यानं मोठं वक्तव्य केलं आहे. शुभमन गिलनं त्याच्या कामगिरीत सुधारणा केली नाही तर त्याचं भारताच्या वनडे संघातील स्थान संकटात येईल, असं सलमान बट म्हणाले. 


शुभमन गिलनं श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये संथगतीनं खेळी केली होती. शुभमन गिलला भारतीय संघातील स्थान पक्कं करण्यासाठी कामगिरीत सातत्य ठेवण्याची गरज आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत शुभमन गिलनं 35  बॉलमध्ये 16  धावा केल्या. सलमान बट यानं शुभमन गिलचं कौतुक देखील केलं आहे. 


शुभमन गिल हा गेल्या 18 महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, सध्याची त्याची कामगिरी चांगली होत नाही. गिल गेल्या काही सामन्यांमध्ये 20-30 धावांमध्ये बाद होत आहे. 


सलमान बट त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाले की, शुभमन गिल यानं गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दमदार फलंदाजांपैकी एक असून सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. मात्र, तुम्ही जर 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर त्याची फलंदाजी पाहिली असता चांगली सुरुवात केल्यानंतर शुभमन गिलनं विकेट गमावल्याचं पाहायला मिळतं, असं सलमान बट म्हणाले. 


सलमान बट पुढे म्हणाले की, त्यानं 20-25 धावा केल्या आणि तो बाद झाला. शुभमन गिलनं हवेत शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि तो सर्कलच्या आतमध्ये कॅच आऊट झाला आहे. तो लवकर त्याची एकाग्रता गमावत असल्याचं पाहायला मिळतं. 20-30 धावा हा टप्पा शुभमन गिल साठी आव्हानात्मक असावा, असं सलमान बट म्हणाला.


दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं झिम्बॉब्वे दौऱ्यात  पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत विजय मिळवला होता. भारतानं झिम्बॉब्वेला 4-1 असं पराभूत केलं होतं. शुभमन गिलवर बीसीसीआयनं टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचं नेतृत्त्व सोपवलं होतं. 


संबंधित बातम्या :


MS Dhoni: विराट कोहली सोबतच्या आठवणी माहीनं जागवल्या, महेंद्रसिंह धोनी किंग कोहलीबाबत काय म्हणाला... 


भारताची श्रीलंकेविरुद्ध एका रननं विजयाची संधी हुकली, मराठमोळ्या खेळाडूनं इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडला, VIDEO