IPL 2022 Auction Update : देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्या धडकी भरवणारी ठरत आहे. दररोज यामध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरुन मागील २४ तासांत देशात एक लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने अधिक चिंता वाढवली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. देशातील कोरोना परिस्थिची प्रभाव आयपीएलच्य आगामी हंगामावर पडण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2022 चे मेगा ऑक्शन दहा दिवसांनी पुढे जाऊ शकते.  आयपीएल 2022 चे मेगा ऑक्शन सात आणि आठ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता क्रिकेट वेबसाइट क्रिकबजने काही दिवसांपूर्वी वर्तवली होती.  


भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयकडून अद्याप आयपीएलच्या मेगा ऑक्शनच्या जारखा अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. पण क्रिकबजने आपल्या रिपोर्ट्समध्ये केलेल्या दाव्यानुसार, सात आणि आठ फेब्रुवारी रोजी बंगळुरुमध्ये आयपीएल २०२२ चा लिलाव होऊ शकतो. दरम्यान, अहमदाबाद संघासोबत झालेला वादामुळे लिलावाच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या असू शकतात, असा दावा एका रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. अहमदाबादच्या संघ मालकांना अद्याप बीसीसीआयकडून काही महत्वाची कागदपत्रे मिळालेली नाहीत. बीसीसीआय अहमदाबादसोबतच्या वादावर गंभीर आहे.  


अहमदाबाद - बोर्ड नेमका वाद काय?
रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादच्या कंपनीवर अनेक सट्टेधारकांसोबत व्यावसाय सुरु असल्याचा आरोप आहे. त्यामुळे बोर्डाकडून अहमदाबाद संघाची कागदपत्रे अडवण्यात आली आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद संघाला क्लीन चीट मिळू शकतो.  


यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक मोठे खेळाडू सहभागी होणार आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात डेविड वॉर्नर, केएल राहुल, शिखर धवन, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, राशिद खान, दिनेश कार्तिक यांच्यासह अनेक मोठे खेळाडू सहभागी येणार आहे. दरम्यान आयपीएलमधील प्रत्येत संघाला चार खेळाडू  रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली होती. तर उरलेल्या इतर खेळाडूंचा समावेश लिलावात करण्यात येणार आहे. 



संबधित बातम्या :