IPL 2022 Mega Auction Update: आयपीएलच्या आगामी मोसमाआधी खेळाडूंचा पुन्हा लिलाव करण्यात येणार असून, येत्या 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूत या लिलावाचं आयोजन करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे लिलावाची तारीख जाहीर केलेली नाही.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूत 12 आणि 13 फेब्रुवारी आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या अगोदर 7 आणि 8 फेब्रुवारीला लिलाव होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आगामी मोसमापासून आयपीएलच्या रणांगणात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे. त्या दोन संघांना लिलावाच्या पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडूंची निवड करण्याची आधी संधी देण्यात येईल. त्यानंतर लिलावामधल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येईल. आयपीएलमधल्या आधीच्या आठही संघांनी आपल्या किमान दोन ते चार खेळाडूंना राखण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक मोठे खेळाडू सहभागी होणार आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात डेविड वॉर्नर, केएल राहुल, शिखर धवन, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, राशिद खान, दिनेश कार्तिक यांच्यासह अनेक मोठे खेळाडू सहभागी येणार आहे. दरम्यान आयपीएलमधील प्रत्येत संघाला चार खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली होती. तर उरलेल्या इतर खेळाडूंचा समावेश लिलावात करण्यात येणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- IND vs SA Test Series : कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरीजमध्ये करु शकतो खास रेकॉर्ड, कोच राहुल द्रविडला मागे टाकण्यासाठी सज्ज
- IND vs SA : पहिल्या कसोटी सामन्याआधी विराटसेनेचा कसून सराव, कर्णधार Virat Kohli ने शेअर केले फोटो
- IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला सामना होणार प्रेक्षकांशिवाय, जाणून घ्या काय आहे कारण?