IPL 2022 Auction: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाआधी अनेक फ्रेंचायझीनं आपल्या अनेक खेळाडूंना करारमुक्त केलंय.  फ्रेंचायझीनं मंगळवारी त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केले. महत्वाचं म्हणजे, फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील फक्त चार खेळाडूंना कायम ठेवण्याची मुभा होती. ज्यात तीन पेक्षा जास्त भारतीय आणि दोन पेक्षा जास्त परदेशी खेळाडू कायम ठेवण्यास परवानगी नव्हती. यामुळं कोणत्या खेळाडूला कायम ठेवायचं आणि कोणाला करारमुक्त करायचं? याचं प्रत्येक फ्रेंचायझीसमोर मोठं आव्हान होतं. मात्र, तरीही प्रत्येक फ्रेंचायझीनं आपल्या संघातील उत्कृष्ट खेळाडू कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनंही त्यांच्या तीन खेळाडूंना संघात कायम ठेवलंय. आता बेंगलोरचा संघ आयपीएलच्या ऑक्शमध्ये खालील पाच खेळाडूंना संघात सामील करून घेण्यासाठी जोर लावण्याची शक्यता आहे. 


आरसीबीनेही विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना कायम ठेवले आणि उर्वरित संघ तयार करण्यासाठी ऑक्शनमध्ये बोली लावणार आहेत. संघाला विराट कोहलीच्या कर्णधारपदापासून ते एबी डिव्हिलियर्सच्या पर्यायापर्यंत सर्व काही शोधावं लागणार आहे. आरसीबी कोणते खेळाडू विकत घेऊ शकते ते पाहू या.


डेव्हिड वार्नर- 


ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरला संघात सामील करून घेण्यासाठी आरसीबीचा संघ धडपड करू शकतो. यासाठी आरसीबीचा संघ ऑक्शनमध्ये पैशांचा पाऊस पाडू शकतो. डेव्हिड वॉर्नरला संघात सामील केल्यानं संघाच्या सलामीच्या गणितात सुधारणा होऊ शकते. डेव्हिड वार्नर गेल्या अनेक हंगामापासून सनरायझर्स हैदरबाद संघाचा भाग होता. मात्र, आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी हैदराबादनं त्याला करारमुक्त केलंय. 


शिमरॉन हेटमायर-


आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला संघात कायम ठेवलंय. जर बेंगलोरनं शिमरॉन हेटमायरला ऑक्शमध्ये विकत घेतल्यास संघाची फलंदाजी आणखी मजबूत होईल. आरसीबीकडे मधल्या फळीत डाव्या हाताच्या फलंदाजाची कमतरता आहे, ज्याची भरपाई हेटमायरच्या रुपात होऊ शकते. दिल्लीनं करारमुक्त केलेल्या हिटमायरला आक्रमक फलंदाज म्हणून ओळखलं जातं. त्यानं आयपीएलच्या मागील हंगामात दिल्लीसाठी चांगली कामगिरी केली.


श्रेयस अय्यर-


दिल्ली कॅपिटल्स सोडल्यानंतर श्रेयस अय्यर देखील मेगा ऑक्शनमध्ये दिसणार आहे. त्याला खरेदी करण्याचा आरसीबीचा प्रयत्न असेल. मधल्या फळीतील फलंदाजीला स्थिरता देण्यासाठी श्रेयस अय्यर उत्तम पर्याय ठरू शकतो. महत्वाचं म्हणजे, विराट कोहलीनं आरबीचं कर्णधारपदं सोडलंय. यामुळं आरसीबीला श्रेयस अय्यरच्या रुपात कर्णधारपदाचा पर्याय मिळू शकतो. त्यानं दिल्लीचं नेतृत्व केलंय. ज्याचा फायदा आरसीबीला होऊ शकतो. 


देवदत्त पडिक्कल-


देवदत्त पडिकलनं मागील हंगामात चांगली कामगिरी करून दाखवलीय. मात्र, तरीही संघ व्यवस्थापनानं त्यांना कायम ठेवण्यात रस दाखवला नाही. पण पडिकलला ऑक्शनमध्ये विकत घेण्यासाठी आरसीबी बोली लावताना नक्कीच दिसेल. 


आर. अश्विन-


 तर, टी-20मध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या अश्विनवर आरसीबीची नजर असणार आहे. आरसीबीने सिराजला गोलंदाज म्हणून कायम ठेवलंय. अश्विनचं संघात सामील झाल्यानं आरसीबीची गोलंदाजी आणखी मजबूत होईल. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-