IPL 2022: लखनौ आणि अहमदाबाद संघात सामील होण्यासाठी 'या' खेळाडूंची नावे चर्चेत
2022 च्या आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन्ही नवीन संघाना तीन तीन खेळाडू खरेदी करण्याची संधी आहे. यामध्ये सामील होण्यासाठी अनेक खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIshan kishan : इशान किशनने गेल्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी दमदार खेळ दाखवला होता, तरीही मुंबईने त्याला कायम केले नाही. त्यामुळे तो लखनौच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे. (Photo credit : Ishan kishan/facebook)
Rashid Khan : सनरायझर्स हैदराबादचा राशिद खान लखनौची दुसरी पसंती ठरु शकतो. हैदराबादने त्याला कायम ठेवलेले नाही. त्यामुळे राशिद हा लखनौ संघाकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. (Photo credit :Rahid Khan/facebook)
Devid Warner: आयपीएलच्या शेवटच्या मोसमात सपशेल अपयशी ठरलेल्या डेव्हिड वॉर्नर अहमदाबाद फ्रँचायझीमध्ये सामील झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात तो मालिकावीर ठरला होता. (Photo credit : Devid Warner/facebook)
Hardik pandya : हार्दिक पांड्या सध्या फॉर्ममध्ये नाही. मुंबईने त्याला कायम ठेवलेले नाही. त्यामुळे तो पुढील आयपीएलमध्ये अहमदाबादकडून खेळताना दिसू शकतो. (Photo credit :Hardik pandya/facebook)
KL Rahul : केएल राहुल हा लखनौ टीममध्ये सामील होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. लखनौने केएल राहुलसमोर 20 कोटींची ऑफर ठेवल्याची माहितीही समोर आले आहे. केएल राहुल हा संघाचा कर्णधार म्हणून संघात सामील होऊ शकतो. (Photo credit :KL Rahul/facebook)
Shreyas Ayyar : अहमदाबाद मेगा लिलावापूर्वी ज्या तीन खेळाडूंना खरेदी करण्याचा विचार करत आहे. त्यामध्ये श्रेयस अय्यरचे नाव आघाडीवर आहे. श्रेयसला कर्णधारपदाची संधी मिळू शकते. (Photo credit :Shreyas Ayyar/facebook)