Cheteshwar Pujara Team India : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा (World Test Championship 2023) अंतिम सामना जूनमध्ये रंगणार आहे. ओव्हल येथे भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा अद्याप झालेली नाही. दरम्यान, भारतीय कसोटी संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या चेतेश्वर पुजाराबद्दल (Cheteshwar Pujara) एक मोठी बातमी समोर येत आहे. दरम्यान चेतेश्वर पुजाराकडे काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये एका संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


चेतेश्वर पुजाराकडे काऊंटी क्लब ससेक्सची धुरा


खराब फॉर्ममुळं भारतीय कसोटी संघातून वगळलेल्या भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) काऊंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या काऊंटी क्लब ससेक्सकडून खेळताना दिसणार आहे. ससेक्स संघाने चेतेश्वर पुजाराकडे कर्णधारपद सोपवलं आहे. काऊंटी क्रिकेटच्या पुढील हंगामात तो ससेक्स काऊंटी क्लब संघाची (Sussex County Cricket Club) धुरा सांभाळताना दिसणार आहे. याची माहिती चेतेश्वर पुजाराने त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली आहे. 






 


चेतेश्वर पुजाराने याबाबत ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स संघाचे नेतृत्व करण्यास मी रोमांचित आहे!''






काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धा, ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब


काउंटी चॅम्पियनशिप ही इंग्लंड आणि वेल्समधील देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाद्वारे आयोजित केली जाते. 1890 पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब (Sussex County Cricket Club) हा इंग्लंड आणि वेल्सच्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणी काऊंटी क्लबपैकी सर्वात जुना संघ आहे.


पुजारा टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक


चेतेश्वर पुजारा हा टेस्ट फॉरमॅटमधील टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. चेतेश्वर पुजाराला कसोटीत संघाची भिंतही म्हटलं जातं. त्यानं टीम इंडियासाठी आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजाराने 43.89 च्या सरासरीने 7154 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने 35 अर्धशतके आणि 19 शतके झळकावली आहेत


महत्त्वाच्या इतर बातम्या :


World Cup 2023 : विश्वचषकाआधी न्यूझीलंडला मोठा झटका, आयपीएलमध्ये दुखापत झालेला केन विल्यमसन वर्ल्ड कपला मुकणार