Smriti Mandhana: टीम इंडियाची (Team India) उपकॅप्टन आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत विद्यापीठामध्ये बी.कॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. याबाबतची माहिती घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली. तिच्या प्रवेशाविषयी बोलताना भोसले म्हणाले की, स्मृती मानधनाने बी.कॉम प्रवेशासाठी संजय घोडावत विद्यापीठाची निवड केली हा आमच्यासाठी गौरव आहे. तिच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू.


दरम्यान, संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी स्मृती मानधनाचे प्रवेश घेताना स्वागत केले. विद्यापीठाच्या शिरपेचात हिरा गवसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, विद्यापीठ नेहमीच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठबळ देत असते. यापूर्वी 18 वर्षाखालील गटात लॉन टेनिस प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या ऐश्वर्या जाधवला आम्ही प्रवेश देऊन सर्वतोपरी मदत करत आहोत. येथील क्रीडापटू ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. विद्यापीठाची घोडदौड सर्वोत्कृष्टतेकडे होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.


कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. योगेश्वरी गिरी यांनी देखील स्मृती मानधनाचे स्वागत केले.


स्मृती मानधनाची आयपीएलमध्ये सुमार कामगिरी 


दुसरीकडे, भारताची सलामी फलंदाज स्मृती मंधानाला आरसीबीने कोट्यवधी रुपये खर्च करुन संघात घेतलं होतं. स्मृती महिला आयपीएलमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली होती, पण तिला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. सहा सामन्यात आरसीबीची कामगिरी तर हवी तशी झाली नाहीच. पण कर्णधार स्मृती मंधानाची बॅटही शांतच राहिली. स्मृतीला सहा सामन्यात 100 धावाही करता आल्या नाहीत. 


कोट्यवधी रुपयांना खरेदी केलेल्या स्मृतीला आरसीबीने कर्णधारपद दिलं. पण स्मृतीला फलंदाजी आणि नेतृत्वातही आपली चमक दाखवता आली नाही. आरसीबीला एकापाठोपाठ एक पराभवाचा सामना करावा लागला. त्यावेळी स्मृतीची कामगिरी सुमार दिसली. सहा सामन्यात स्मृतीला 100 धावाही करता आल्या नाहीत. स्मृती मंधानाने सहा सामन्यात फक्त 14.6 च्या सरासरीने आणि 112 च्या स्ट्राईक रेटने फक्त 88 धावा केल्या. यादरम्यान स्मृतीची सर्वोच्च धावसंख्या 35 इतकी राहिली. सहा डावात तीन वेळा स्मृतीला दुहेरी संख्याही गाठता आली नाही. 


महत्वाच्या इतर बातम्या :