Cheteshwar Pujara Century in County Cricket : एकीकडे सर्व भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये (IPL 2023) व्यस्त आहेत, तर दुसरीकडे भारतीय कसोटी संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने परदेशात धमाकेदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) काऊंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) शतकं ठोकलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी चेतेश्वर पुजाराने दमदार शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियन संघाला धोक्याचा इशारा दिलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 7 जूनपासून सुरु होणार आहे. काऊँटी क्रिकेटमध्ये सक्सेस क्लब संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण करताना पुजाराने पहिलं शतक झळकावलं आहे. संघासाठी अत्यंत कठीण परिस्थितीत त्याने ही शतकी खेळी केली आहे. संघाने 44 धावांवर दोन विकेट गमावल्या असताना पुजारा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. यादरम्यान, त्याने 163 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 ठोकत 115 धावांची शानदार खेळी खेळली. 


पुजारानं काऊंटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलं धमाकेदार शतक 


पुजाराने ऑलिव्हर कार्टरसोबत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यामुळे ससेक्सचा संघाला 300 धावांचा यशस्वी टप्पा पार करता आला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी पुजाराने इंग्लंडमध्ये हे शतक ठोकून ऑस्ट्रेलियन संघासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. त्याआधी पुजाराची जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे.






वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पुजाराची दमदार तयारी


भारतीय क्रिकेट संघातील (Team India) जवळपास सर्व प्रमुख खेळाडू सध्या आयपीएल 2023 मध्ये व्यस्त आहेत. कर्णधार रोहित शर्मा असो किंवा आघाडीचा फलंदाज विराट कोहली, सगळेच भारतीय टी-20 लीगच्या झगमगाटात व्यस्त आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू आयपीएलपासून दूर सरावात व्यस्त आहे. अशात टीम इंडियाचा खेळाडू आहे, चेतेश्वर पुजारा सध्या आगामी काळात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी तयारी करत आहे. त्याने परदेशात सहा शतकं झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


चेतेश्वर पुजाराकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी


टीम इंडियाच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तयारी सुरू केली आहे. पुजारा आयपीएलपासून दूर आहे. दोन महिन्यांपूर्वीच तो इंग्लंडला गेला आहे. पुजारा पुन्हा एकदा काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी पोहोचला आहे. यावेळी पुजाराकडे काऊंटी क्लबमधील ससेक्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. पुजाराने काऊंटी क्रिकेटच्या माध्यमातून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी तयारी सुरू केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या शेवटच्या फायनलमधील पराभव पुजाराच्या लक्षात असेल. हा पराभव विसरून यावेळेस इतिहास घडवण्याचं पुजाराचं लक्ष्य असेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराकडे कर्णधारपद, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी मोठी बातमी