Cheteshwar Pujara in County Cricket : मागील काही दिवसांपासून फॉर्मसबत लढणारा पुजारा आता एकापाठोपाठ एक शतक ठोकत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंट क्रिकेटमध्ये पुजाराने शतकांचा रतीब घातलाय. चार सामन्यात चार शतके झळकावली आहे. इकडे भारताचे क्रिकेटपटू आयपीएलमध्ये व्यस्त असताना तिकडे पुजारा शतकांवर शतक ठोकत आहे. काउंटी चॅम्पियनशिप डिविजन-2 मध्ये ससेक्स संघाकडून खेळताना पुजाराने धावांचा पाऊस पाडला. यावेळी पुजारा आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंलाज शाहीन शाह आफ्रिदी यांचा सामना झाला. आफ्रिदी सध्या जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजापैकी एक आहे. आपल्या वेगवान माऱ्यामुळे तो प्रसिद्ध आहे. याच आफ्रिदीचा आणि पुजाराचा सामना झाला.
पुजारा फलंदाजीसाठी नुकताच मैदानात उतरला होता. तेव्हा त्याचं स्वागत करण्यासाठी शाहीन आफ्रिजी सज्ज होता. आफ्रिदीने खतरनाक बाऊन्सर फेकून पुजाराला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. पण आफ्रिदीच्या बाऊन्सरला न घाबरता पुजाराने कडक षटकार लगावला. पुजाराचा अप्पर कट सध्या चर्चेत आहे. पुजाराच्या फटकेबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय... या व्हिडीओत पुजाराची दमदार फलंदाजी दिसतेय.
पाहा व्हिडीओ.....
ससेक्स संघाकडून खेळताना पुजाराने चार सामन्यात चार शतकं ठोकली आहेत. नुकतंच त्याने मिडलसेक्सविरुद्ध शतक लगावलं आहे. याआधी त्याने डर्बीशायर, वोरचेस्टरशायर आणि डरहम संघाविरुद्ध शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे काउंटी चॅम्पियनशिपच्या या हंगामात पुजाराच्या चार शतकांमध्ये दोन द्विशतकांचा समावेशही आहे.
काउंटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा दुसराच भारतीय
पुजाराने या हंगामात डर्बीशायरविरुद्ध दुहेरी शतक ठोकलं. दरम्यान काउंटी क्रिकेटमध्ये ही आकडेवारी पार करणारा पुजारा दुसराच भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी केवळ भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याने 1991 आणि 1995 मध्ये काउंटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतकं लगावली होती.