Charlie Cassel World Record: क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विश्वविक्रम रचला गेला आहे. जागतिक विक्रम अनेकदा फलंदाजीत पाहायला मिळतात, मात्र यावेळी गोलंदाजीत ऐतिहासिक कामगिरी केली. हा विक्रम स्कॉटिश गोलंदाज चार्ली कॅसलने (Charlie Cassel) केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला मागे टाकत चार्ली कॅसलने हा विक्रम केला. स्कॉटलंडच्या चार्ली कॅसलने वर्ल्ड कप लीग 2 च्या ओमानविरुद्धच्या सामन्यात हा विश्वविक्रम केला.


चार्ली कॅसलने कारकिर्दीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेत सर्वोत्तम स्पेल गोलंदाजी करण्याचा विक्रम केला. त्याने दक्षिण अफ्रिकेचा वेगवान कागिसो रबाडाला मागे सोडले. चार्लीने ओमानविरुद्ध खेळलेल्या पदार्पणाच्या सामन्यात केवळ 21 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाच्या नावावर होता. कगिसो रबाडाने बांगलादेशविरुद्ध वनडे पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने अवघ्या 16 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या.


वनडे पदार्पणातील सर्वोत्तम गोलंदाजी-


चार्ली कॅसल (स्कॉटलंड)- 7/21


कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)- 6/16


फिडेल एडवर्ड्स (वेस्ट इंडीज)- 6/22






चार्ली कॅसलने ओमानला लोळवलं-


सदर सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या ओमानचा संघ चार्ली कॅसलसमोर टिकू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना ओमानचा संघ 21.4 षटकांत अवघ्या 91 धावांत सर्वबाद झाला. यष्टिरक्षक फलंदाज प्रतीक आठवलेने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळताना 56 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. ओमानचे फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. यादरम्यान चार्ली कॅसलने 7 विकेट्स घेतल्या. रेस्ट ब्रॅडली करी, ब्रँडन मॅकमुलेन, गेविन मेन यांना 1-1 यश मिळाले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडने 17.2 षटकांत 95/2 धावा करून विजय मिळवला. ब्रँडन मॅकमुलेनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 43 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. स्कॉटलंडच्या डावात ओमानकडून फैयाज बट आणि बिलाल खान यांनी 1-1 बळी घेतला.






संबंधित बातम्या:


रंगेहाथ पकडलं अन्...; हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल


हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?