Aakash Chopra on India Travel Pakistan Champions Trophy नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनातील तिढा सुटण्याऐवजी वाढत चालला आहे. फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान पाकिस्तानकडे आहे. आयसीसीनं पीसीबीला मेल करुन बीसीसीआयचा निर्णय कळवला आहे. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळण्यास भारतीय क्रिकेट संघ तयार नसल्याचं आयसीसीनं पीसीबीला कळवलं आहे. या सर्व वादावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं भाष्य केलं आहे. भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात कोणताही अर्थ राहणार नाही, असंही त्यानं म्हटलंय.
आकाश चोप्रानं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर चर्चा करताना म्हटलं की, हा एक आयसीसीचा इव्हेंट आहे, प्रक्षेपण करणाऱ्यांना यामध्ये खूप पैसा गुंतवला आहे. जर आयसीसी भारतच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील समावेशाबाबत स्पष्टपणे निर्णय घेऊ शकली नाही तर प्रक्षेपणकर्ते यामध्ये पैसे लावणार नाहीत किंवा त्याबाबत फेरविचार केला जाऊ शकतो. जर भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभाग घातेला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीतून होणारी कमाई देखील कमी होऊ शकतं.
पाकिस्तानला फायदा होणार नाही
आकाश चोप्रानं त्याच्या व्हिडीओत 2023 च्या वर्ल्ड कपचा संदर्भ दिला आहे. जेव्हा पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष जाका अशरफ यांनी म्हटलं होतं की ते त्यांची टीम दुश्मन देशात पाठवत आहेत. जेव्हा भविष्यात भारत जर पाकिस्तानला येण्यास नकार देईल तेव्हा पाकिस्तान कोणतीही मॅच खेळण्यास भारतात जाणार नाही. मात्र, आकाश चोप्राच्या मतानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या मुद्याचा फायदा होणार नाही. आकाश चोप्रा म्हणाला भारत जर स्पर्धेत नसेलत त्या चॅम्पियन्स ट्रॉफीला अर्थ राहणार नाही. पाकिस्तानसह सर्व संघांना या बाबी चांगल्या प्रकारे समजतात.
पीसीबीचे चेअरमन मोहसीन रजा नकवी यांनी भारत सरकारच्या भूमिकेवर पाकिस्तान सरकारकडून सल्ला मागितला आहे. मिडिया रिपोर्टनुसार पीसीबीला पाकिस्तान सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
इतर बातम्या :