Champions Trophy 2025 : ICC चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यासाठी काही दिवस उरले असतानाच आता मोठी माहिती समोर आलीये. खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेतले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत पाकिस्तानातील 3 मैदानांचे काम पूर्ण झालेले नाही. या स्टेडियममध्ये आणखी बरेच काम करण्याची गरज नाही. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये 3 स्टेडियम बांधले जात आहे. या स्टेडियमचे काम ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झाले होते. ते 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. मात्र, ते अद्याप झालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून यजमानपद कधीही काढले जाऊ शकते. 






पाकिस्तान आयसीसीचे यजमानपद गमावू शकतो


या वाईट व्यवस्थेचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सहन करावा लागू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमवावे लागू शकते, असे मानले जात आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यासाठी केवळ 35 दिवस उरले आहेत. मात्र त्याआधीच पाकिस्तानच्या ढिसाळ नियोजनाचे धक्कादायक चित्र समोर येत आहेत.


आयसीसीचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अल्टिमेटम 


चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेतल्यास संयुक्त अरब अमिरात हे सामने खेळवले जाऊ शकतात. यूएईला यजमानपदाची संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, याआधी आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अल्टिमेटम दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण स्टेडियमची कामे 25 जानेवारीपर्यंत पूर्ण करावी लागतील, असे आयसीसीसकडून सांगण्यात आले आहे. यानंतर आयसीसीचे अधिकारी या स्टेडियमचा आढावा घेतील. त्यानंतर ते स्टेडियम स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार आहे की नाही ते आपल्या अहवालात सांगण्यात येईल. 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येणार आहेत. त्याचवेळी भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याची तयारी करणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 22 फेब्रुवारीला सामना होणार आहे.






इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sam Konstas : मिशाही न फुटलेल्या काॅन्स्टासला धक्का देताच राडा, दंडही झाला, आता त्याच काॅन्स्टासकडून कोहलीचं 'विराट' कौतुक! दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सुद्धा सांगितलं


Rohit Sharma Mumbai Indians : 8 जानेवारी 2011... 12 वाजून 21 मिनिट! 'हा' तोच दिवस होता जेव्हा अंबानींना सापडला 5 ट्रॉफी जिंकून देणारा हिरो, पाहा VIDEO