Sam Konstas : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 2024-25 मध्ये टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं, पण चाहत्यांसाठी अनेक संस्मरणीय क्षण होते. अनेक डाव आणि गोलंदाजीचे अनेक स्पेल असे होते की चाहते विसरणार नाहीत. मैदानावरील खेळाव्यतिरिक्त अशा काही घटनाही घडल्या ज्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले. किंग विराट कोहलीने सॅम काॅन्स्टासला धक्का दिला तो क्षण चाहते कधीही विसरणार नाहीत. विराटला दंड ठोठावण्यात आला. अनेक क्रिकेटपटूनी सुद्धा कोहलीवर तोफ डागली. मात्र, मालिका संपल्यानंतर आता काॅन्स्टासला वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये त्याने विराटवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
'आयडॉल' विराटशी भेट झाली
काॅन्स्टास म्हणाला की, त्याची 'आयडॉल' विराटशी भेट झाली. विराट जादुई असल्याचे वर्णनही त्यांनी केले. कोड स्पोर्ट्सशी बोलताना काॅन्स्टास म्हणाला की, सामन्यानंतर मी त्याच्याशी थोडे बोललो. मी त्याला सांगितले की तो माझा आदर्श आहे आणि त्याच्याविरुद्ध खेळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. त्याची मैदानावर असलेली उपस्थिती अप्रतिम आहे. एवढा मोठा खेळाडू असूनही तो खूप डाऊन टू अर्थ आहे. तो खूप छान माणूस आहे. माझ्या श्रीलंका दौऱ्यासाठी त्याने मला शुभेच्छा दिल्या. कॉन्स्टास पुढे म्हणाला की, माझे संपूर्ण कुटुंब विराटवर प्रेम करते. मी त्याला लहानपणापासूनच माझा आदर्श मानतो. तो खेळातील एक दंतकथा आहे. जेव्हा-जेव्हा तो मैदानावर आला तेव्हा भारतीय प्रेक्षकांचा उत्साह एका वेगळ्याच पातळीवर असायचा. लोक त्याच्या नावाचा जयघोष करत होते. ते वातावरण खूपच अप्रतिम होतं.
काय होती संपूर्ण घटना?
मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ही घटना घडली होती. सामन्याच्या पहिल्याच दिवशी, ऑस्ट्रेलियन डावाच्या 11व्या षटकात, कॉन्स्टास क्रीजवर उपस्थित असलेला त्याचा सहकारी उस्मान ख्वाजाशी बोलणार होता. त्यानंतर तो तिथून जात असतानाच विराट कोहलीने धक्का दिला. दोन्ही खेळाडूंचे खांदे एकमेकांना भिडले आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून उस्मान ख्वाजाने कॉन्स्टासला समजावून सांगितले. पंचांनीही हस्तक्षेप करून प्रकरणावर पडदा पाडला. या प्रकारानंतर आयसीसीने विराट कोहलीला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला. कोहलीला एक डिमेरिट पॉइंटही मिळाला. कोहलीने मॅच रेफरीसमोर आपली चूकही मान्य केली होती. कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येच कसोटी पदार्पण केले होते. त्याने शेवटचे दोन कसोटी सामने खेळले. ज्याच्या चार डावात त्याने 28.25 च्या सरासरीने एकूण 113 धावा केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या