Indian cricketer Kedar Jadhav : खेळाडूंनी राजकारणात येणे हे काही भारतात नवीन नाही. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी खेळाला अलविदा केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला, त्यापैकी काही राजकारणातही आले. मात्र, काही यशस्वी झाले आहेत, तर काहींना सपशेल अपयशही आले. सध्याच्या भारतीय संघाचा कोच आणि माजी सलामीवीर गौतम गंभीरने क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजकारणाच्या जगात पहिले पाऊल ठेवले होते. गंभीरने पूर्व दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि एकतर्फी विजय मिळवला होता. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी बातमी येत आहे. रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
केदार जाधव भाजपमध्ये करणार प्रवेश?
भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा, राजकीय वर्तुळात सूरू झाली आहे. खरं तर, केदार जाधवने भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. भाजपच्या सदस्य नोंदणी दरम्यान आज त्याने भेट घेतल्यानंतर चर्चा सूरू झाली. पण खरंच केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार? हे अजून तरी गुलदस्त्यात आहे, पण येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द
केदार जाधवच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याला त्याच्या कारकिर्दीत कसोटी फॉर्मेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 73 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 42.09 च्या प्रभावी सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. मात्र, टी-20 सामन्यांमध्येही त्याची आकडेवारी काही खास नव्हती. जाधवने केवळ 9 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत.
आयपीएल क्रिकेट कारकीर्द
केदार जाधवने 2010 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 93 सामन्यांमध्ये 1196 धावा केल्या. आरसीबीसाठी त्याने 17 सामने खेळले आहेत. केदार जाधव 2010 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला तर 2011 मध्ये तो कोची टस्कर्स केरळ संघाचा भाग होता. यानंतर, तो पुन्हा 2013 ते 2015 पर्यंत दिल्ली संघाचा भाग बनला आणि नंतर 2016 आणि 2017 मध्ये आरसीबी संघात सामील झाला. तो 2018 ते 2020 पर्यंत सीएसके संघाचा भाग होता आणि त्यानंतर 2021 मध्ये त्याला हैदराबादकडून खेळण्याची संधी मिळाली. मागील हंगामात म्हणजे 2022 मध्ये कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नव्हते, परंतु आता आरसीबीने त्याला या हंगामासाठी पुन्हा खरेदी केले आहे.