Champions Trophy 2025 Ind vs NZ Final: 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy 2025) जेतेपद पटकावले. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आणि तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. दरम्यान, अनेक खेळाडूंचे कुटुंबीयही मैदानात उपस्थित होते. विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील मैदानामध्ये उपस्थित होती.






रोहित शर्मा अन् अनुष्का शर्माची मिठी- (Anushka Sharma hugging Rohit Sharma and congratulating him)


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि त्याची मुलगी देखील सामना पाहण्यासाठी आली होती. यावेळी रोहित शर्मा आणि रितिका एकमेकांशी बोलत होते. दरम्यान थोड्या अंतरावर अनुष्का शर्मा देखील शांतपणे उभी होती. रोहित शर्माने पुढे जात अनुष्काला मिठी मारली. अनुष्काने देखील रोहित शर्माला अभिनंदन केले. यानंतर अनुष्कानेही हार्दिक पांड्याला मिठी मारून अभिनंदन केले.










मी वनडेतून निवृत्त होणार नाही; रोहित शर्माने स्पष्ट सांगितले-


चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा तसा निर्णय घेऊ शकतो अशा अफवांना चर्चा आलं होतं. मात्र, पत्रकार परिषद संपवताना रोहितनं निवृत्तीवर मोठं भाष्य केलं. रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्धची मॅच जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. यानंतर रोहितनं पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. पत्रकार परिषद संपवताना रोहित शर्मानं निवृत्तीबाबत आवर्जून भाष्य केलं. अजून एक गोष्ट सांगतो, मी वनडेतून निवृत्त होणार नाही, अफवांना हवा देऊ नका, असं रोहित म्हणाला.


संबंधित बातमी:


Champions Trophy 2025: गंभीर बोलला, रोहितने हट्ट केला; नहीं नहीं नहीं बोलत जय शाहांचा हात पकडून उड्या मारल्या, VIDEO


Champions Trophy 2025 Virat Kohli: मेरा भारत महान! एकीकडे जंगी सेलीब्रेशन, दुसरीकडे मायेचा हात; विराट कोहली तिच्याजवळ गेला अन्..., PHOTO